जबरदस्तीने बिकिनी फोटोशूट, विनयभंगाप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 August 2019

पुणे :  ऑडिशनच्या नावाखाली विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडल्याचे समोर  आले आहे. दरम्यान जबरदस्तीने बिकिनी फोटोशूट करुन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी नाट्यकलाकार मंदार कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली 

मंदार संजय कुलकर्णी (वय 34, रा वसंत बहार अपार्टमेंट, प्रभात रोड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. पिडित तरुणी नाटकात काम करण्यासाठी पुण्यात आली होती.  कुलकर्णी व तक्रारदार तरुणी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दरम्यान, मी सिनेमा आणि टीव्हीवरील मालिकांसाठी लागणाऱ्या अभिनयासाठी तरुण- तरुणींची शिफारस करतो, असे त्याने संबंधित मुलीस सांगितले व तरुणीला ऑडिशनसाठी घरी बोलाविले. त्याप्रमाणे 16 जुलैला सकाळी साडेआठला ही तरुणी त्याच्या घरी आली.

मंदारने तिला फोटोशुट करायचे आहे असे सांगून आधी 'वन पीस'मध्ये फोटोशुट केले. त्यानंतर पिडित तरुणीला बिकिनीत फोटोशुट करण्यास सांगितले. विरोध केला असताना मंदारने जबरदस्तीने बिकिनी फोटोशुट केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तसेच आरोपीने कपडे काढायला सांगून उघडे फोटो घेतले आणि कपडे घालत असतानाच कपड्यांचे माप घेतले. आरोपीने हे फोटोशुट केल्याचे घरी सांगू नको असेही तरुणीला बजावले. दरम्यान पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन मंदार कुलकर्णी याला अटक केली आहे.  फिर्यादीतर्फे ऍड. चिन्मय भोसले आणि ऍड. धनश्री पवार यांनी काम पाहिले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi actor arrested for molastation and Forced bikini photoshoot