Sant Gajanan Shegaviche: यापुढे हा कलाकार साकारणार गजानन महाराजांची भुमिका

सन मराठीवरील अत्यंत महत्वाची मालिका म्हणजे ‘संत गजानन शेगावीचे’.
marathi actor arun kolhatkar will be play gajanan maharaj in sant gajanan shegaviche serial
marathi actor arun kolhatkar will be play gajanan maharaj in sant gajanan shegaviche serialSAKAL

Sant Gajanan Shegaviche Serial News: सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी एका वर्षापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या वाहिनीने प्रेक्षकांच्या मनात एक मानाचं स्थान निर्माण केलं.

‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने वेगवेगळ्या आशयघन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या.

सध्या सन मराठीवर सुरु असणाऱ्या 'महाराष्ट्राची महामालिका' ह्या उपक्रमाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

मनोरंजनाच्या महामेजवानी सोबतच, प्रेक्षकांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधीही यानिमित्ताने मिळत आहे. सन मराठीवरील अत्यंत महत्वाची मालिका म्हणजे ‘संत गजानन शेगावीचे’.

(marathi actor arun kolhatkar will be play gajanan maharaj in sant gajanan shegaviche serial)

marathi actor arun kolhatkar will be play gajanan maharaj in sant gajanan shegaviche serial
Riteish Deshmukh: पप्पांना अभिमान वाटेल असं... धीरजला शुभेच्छा देताना रितेशला विलासरावांची आठवण

‘संत गजानन शेगावीचे’ ही या उपक्रमातील एप्रिल महिन्यातील ‘महाराष्ट्राची महामालिका’ आहे. मनोरंजन आणि भक्तिभावाने परिपूर्ण असलेली ही मालिका आता एक रंजक वळण घेऊन, मालिकेचे अनेक नवे पैलू उलगडणार आहेत.

मालिकेचे कथानक काही वर्षांनी पुढे गेले असून संत गजानन महाराजांच्या भूमिकेत एक नवा अष्टपैलू कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

marathi actor arun kolhatkar will be play gajanan maharaj in sant gajanan shegaviche serial
Vandana Gupte: नाट्यगौरव पुरस्कारात वंदना गुप्ते यांना 'जीवनगौरव' देताना पहिल्यांदाच घडली 'ही' गोष्ट

जेष्ठ अभिनेते मनोज कोल्हटकर ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. तसेच, आपल्या विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते गणेश यादव हे ‘संत गजानन शेगावीचे’ मालिकेतून एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

त्यामुळे अभिनेते मनोज कोल्हटकरांचा गजानन महाराजांच्या भूमिकेतील मालिकेमध्ये प्रवेश आणि गणेश यादव यांची मालिकेतील पाहुणा कलाकार म्हणून विशेष भूमिका कथानकात काय रंजकता आणणार हे पाहण्यासाठी आता प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे.

सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे. अरुण कोल्हटकर हे मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत.

आजवर अनेक मालिका, सिनेमे आणि वेबसिरीजमधून अरुण कोल्हटकर यांनी भूमिका साकारल्या. अरुण कोल्हटकर यांनी फुलपाखरू, होणार सून मी ह्या घरची, ज्योती सावित्री अशा मालिकांमध्ये अभिनय केलाय.

याशिवाय बालगंधर्व, धर्मवीर अशा मराठी सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com