'हा' अभिनेता साकारणार शंकर महाराजांची भूमिका, मालिका ठरतेय लोकप्रिय..

'कलर्स मराठी' वरील 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेत शंकर महाराजांची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
marathi actor chinmay udgirkar play role of shankar maharaj in yogyogeshwar jay shankar serial
marathi actor chinmay udgirkar play role of shankar maharaj in yogyogeshwar jay shankar serial sakal
Updated on

Chinmay udgirkar : रामायण, महाभारत या मालिकांपासून सुरु झालेला पौराणिक मालिकाचा प्रवास अजूनही थांबलेला नाही. अगदी जय मल्हार, लक्ष्मी नारायण, गणपती बाप्पा मोरया, ज्योतिबा अशा आघाडीच्या मराठी पौराणिक मालिकांची परंपरा आपल्याकडे आहे. त्यात कलर्स मराठी वाहिनी सध्या सगळ्यात अग्रेसर दिसत आहे. या वाहिनीवर आता तीन पौराणिक मालिका एकाच वेळी सुरु आहेत. 'जय जय स्वामी समर्थ' आणि 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या हिट मालिकांसोबत 'योगयोगेश्वर जय शंकर' ही नवी पौराणिक मालिका नुकतीच कलर्स मराठीवर सुरु झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसात या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले असून आता शंकर महाराजांची भूमिका कोण साकारणार यांची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. (marathi actor chinmay udgirkar play role of shankar maharaj in yogyogeshwar jai shankar serial)

marathi actor chinmay udgirkar play role of shankar maharaj in yogyogeshwar jay shankar serial
'कमला पसंत का कमाल' चाहत्याच्या टीकेवर अमिताभ बच्चन संतापले, म्हणाले..

'योग योगेश्वर जय शंकर' ही कैलासपती शंकराची ही कथा आहे. त्यांनी योगेश्वर महाराजांच्या रूपात धरतीवर जन्म घेतला, अशी आख्यायिका आहे. आजही लाखो भाविक शंकर महाराजांच्या मठामध्ये दर्शनासाठी गर्दी करतात. याच शंकर महाराजांची कथा आता घराघरात पोहोचते आहे. सध्या मालिकेत बाळ शंकर अवतरले असून आरुष बेडेकर हा बाल अभिनेता ही भूमिका साकारत आहे. तर पार्वती बाई म्हणजेच शंकर महाराजांच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री उमा पेंढारकर आहे. ह्या मालिकेने अवघ्या सात दिवसातच प्रेक्षकांची मनं जिंकली.

आता उत्सुकता आहे ती मूळ शंकर महाराजांची भूमिका कोण साकारणार याची. या मालिकेचा निर्माताच शंकर महाराजांची भूमिका साकारणार आहे अशी चर्चा आहे. हा निर्माता दुसरा तिसरा कुणीही नसून अभिनेता चिन्मय उदगीरकर काही. या मालिकेच्या निमित्ताने चिन्मयने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. चिन्मय उदगीरकर याची पहिली पौराणिक मालिका आहे. या मालिकेविषयी सध्या अनेक गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे शंकर महाराज कोण असणार हे लवकरच कळेल.

चिन्मय यापूर्वी कलर्स मराठी वाहिनीवरील 'घाडगे अॅण्ड सून' मालिकेत अक्षयच्या भूमिकेतून दिसला होता. यासोबतच चिन्मय 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत देखील दिसला होता. या मालिकेतल्या त्याच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळाली होती. मालिका आणि सिनेमात भूमिक साकारत चिन्मयने त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता तो पहिल्यांदाच पौराणिक मालिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. त्याला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते मात्र उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com