esakal | अभिनेता मयुरेशला जामीन, एकनाथ शिंदेंवर केली होती टीका
sakal

बोलून बातमी शोधा

actor mayuresh kotkar

अभिनेता मयुरेशला जामीन, एकनाथ शिंदेंवर केली होती टीका

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मराठी अभिनेता मयुरेश कोटकरला (actor mayuresh kotkar) एका मंत्र्यांच्या विरोधात पोस्ट करणं महागात पडलं होतं. त्यासाठी त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र आता त्याला दोन दिवसांच्या अटकेनंतर जामीन मिळाला आहे. त्यानं एका मंत्र्याच्या विरोधात फेसबूकवर अपमानास्पद पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे वादाच्या भोव-यात सापडला होता. अनेकांनी त्याला ट्रोलही केले होते.( Marathi actor Mayuresh Kotkar gets bail 2 days after arrest for Facebook post)

राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मयुरेशनं परखड शब्दांत टीका केली होती. त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून याप्रकरणामुळे मयुरेश हा चर्चेत आहे. तो मराठीतला एक प्रसिध्द अभिनेता आहे. त्यानं काही मराठी मालिकांमध्ये कामही केलं आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. मात्र त्यानं केलेल्या पोस्टमुळे त्याच्यावर अनेकांनी टीका केल्याचे दिसून आले आहे.

मयुरेशनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्य यांच्याविषयक अपमानास्पद पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर त्याला भारतीय दंड संहितेच्या 505 कलमानुसार अटक करण्यात आली होती. कोटकर याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव दि.बा.पाटील ठेवण्यावर वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. त्यावरुन त्याला ट्रोलही करण्यात आले होते. त्यावेळी त्यानं मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांबाबत आपत्तीजनक शब्द पोस्टमध्ये वापरले होते. याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांनी कोटकरच्या विरोधात तक्रार दाखल होती.

loading image