Sakal Exclusive : 'अभिनेता झालो नसतो तर..' काय म्हणाले मिलिंद शिंदे...

'देवमाणूस' या मालिकेत 'मार्तंड' या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करणारे मिलिंद शिंदे यांनी एक सुप्त इच्छा या मुलाखतीत बोलून दाखवली आहे.
milind shinde as martand in devmanus serial
milind shinde as martand in devmanus serial sakal

(zee marathi) 'झी' मराठी वरील 'देवमाणूस' (devmanus) या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून चांगलंच वेड लावलं आहे. या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच प्रेक्षकांना मालिकेत मार्तंड जामकर (martand jamkar) नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या एंट्रीतून एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळालं. ही भूमिका अभिनेता मिलिंद शिंदे (marathi actor milind shinde) यांनी अगदी चोख बजावली आहे. किंबहुना मार्तंडचा करारी आणि काहीसा विक्षिप्तपणा त्यांनी अचूक दाखवला आहे. कधीतरी त्यांची भीतीही आपल्याला वाटून जाते. मिलिंद यांनी आजवर नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमात लीलया काम केले आणि आपल्या अभिनयाची मोहर उमटवली. सध्या ते मार्तंड म्हणून चर्चेत आहेत.

milind shinde as martand in devmanus serial
'नाही तिला पवार साहेबांच्या पायाशी आणलं तर..' सविता मालपेकर संतापल्या..

या भूमिकेविषयी मिलिंद शिंदे म्हणतात, 'मी एका चांगल्या भूमिकेची वाट बघत होतो. जास्तकरून खलनायक साकारल्यानंतर एक दमदार अशी भूमिका मार्तंड जामकरच्या रूपात माझ्या वाट्याला आली. एक अतिशय इमानदार पोलीस अधिकारी ज्याच्यावर त्याच्या वरिष्ठांचा विश्वास आहे आणि तो कुठलीही केस तडीस नेतो अशी भूमिका मला 'देवमाणूस २' या लोकप्रिय मालिकेत साकारायला मिळाली. फक्त मी ही भूमिका नेहमीसारख्या पोलीस अधिकारीसारखी न निभावता गुन्हेगाराला कायद्याचा धाक वाटेल अशी साकारतोय.'

या मुलाखतीत त्यांनी एक सुप्त इच्छा बोलून दाखवली आहे. मिलिंद आणि मार्तंड यांच्यात काय साम्य आहे असे विचारताच मिलिंद म्हणाले, 'माझ्यामध्ये आणि मार्तंडमध्ये तसं काही साम्य नाही आहे पण माझी आधी इच्छा होती की मी आयएएस किंवा आयपीएस अधिकारी व्हावं. जर मी अभिनेता नसतो झालो तर मी कदाचित आयएएस किंवा आयपीएस अधिकारी झालो असतो आणि तो अधिकारी हा मार्तंड सारखाच असता. मार्तंड जामकर प्रमाणेच इमानदार, तत्वांशी बांधील असणारा, गुन्हेगारांना अद्दल घडवणारा असाच अधिकारी मी झालो असतो.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com