esakal | ‘शेवटी घरची पोळी-भाजीच बेश्ट..’; प्रशांत दामलेंची ‘खास’ पोस्ट व्हायरल

बोलून बातमी शोधा

Prashant Damle
‘शेवटी घरची पोळी-भाजीच बेश्ट..’; प्रशांत दामलेंची ‘खास’ पोस्ट व्हायरल
sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. अशा वेळी हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. काही जण घरात राहून काम करत आहेत, तर काहींना जीव मुठीत घेऊन रस्त्यावर उतरावे लागत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले यांनी याबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पोटापाण्यासाठी आणि कुटुंबासाठी कोरोनाच्या काळात बाहेर पडून काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे. प्रशांत दामलेंची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रशांत दामलेंची पोस्ट:

'कधी कधी ठीक आहे पण शेवटी घरची पोळी भाजीच बेश्ट...वर्षानुवर्षे अतिशय प्रेमाने, निगुतीने संपूर्ण घराला सशक्त ठेवणाऱ्या सुगरणींना खुप धन्यवाद आणि अत्यावश्यक सेवेतील जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या सर्वांनाच मनापासून सलाम. आपण घरातच थांबण हीच त्यांना मदत आहे नाही का?' अशीपोस्ट लिहित प्रशांत दामलेंनी फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये एक फुड डिलेव्हरी बॉय बसस्टॉपवर बसून डबा खात असल्याचं दिसत आहे. हॉटेलच्या पार्सलची डिलेव्हरी करणारा हा डिलेव्हरी बॉय आनंदाने घरून आणलेला डबा खात आहे.

घरची पोळी भाजीच चांगली असते असा संदेश प्रशांत दामले यांनी या पोस्टमधून दिला आहे. त्यांच्या या पोस्टला 10 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी या पोस्टला कमेंट करून पोस्टमध्ये दिलेल्या संदेशाचे कौतुक केले आहे.