esakal | "बिल्डरच्या मुजोरीमुळे महिनाभरापासून पाणी नाही"; अभिनेत्याचा संताप

बोलून बातमी शोधा

sameer Khandekar
"बिल्डरच्या मुजोरीमुळे महिनाभरापासून पाणी नाही"; अभिनेत्याचा संताप
sakal_logo
By
स्वाती वेमूल

'परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र कणखरपणे उभा''काहे दिया परदेस', 'वैजू नंबर वन' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारणारा मराठी अभिनेता समीर खांडेकरने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत बिल्डरच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवला आहे. "जवळपास महिनाभर शांत होतो. संतप्त होऊन हा व्हिडीओ बवनतोय. हे सगळं सहन करण्यापलिकडे गेलंय आता," असं म्हणत त्याने व्यथा मांडली.

तीन वर्षांनंतर पझेशन

"कोरोनामुळे आपण सर्वजण त्रस्त आहोतच. मी स्वत: आणि पत्नी कोव्हिड पॉझिटिव्ह होतो. अत्यंत वैतागून, कंटाळून आणि हतबल होऊन हा व्हिडीओ पोस्ट करतोय. कोरोनापेक्षा मोठं संकट माझ्यावर आणि माझ्या इमारतीत राहणाऱ्यांवर आलंय. मागच्या वर्षी मी बोरिवली पूर्व इथल्या वृंदावर या इमारतीत राहायला आलो. पैसे जमवून हे स्वप्नातलं घर खरेदी केलं. २०१७ मध्ये हे घर आम्हाला मिळणार होतं. पण तीन वर्षे उशिरा २०२० मध्ये घर मिळालं. या काळात भाड्याचा खर्च आणि इतर गोष्टींचाही मनस्ताप झाला", असं म्हणत समीरने समस्या सांगण्यास सुरुवात केली.

महिनाभरापासून पाणीच नाही

"गेले महिनाभर आमच्याकडे पाणीच नाही. आपलं शहर ऑक्सिजनशिवाय तडफडतंय पण आम्ही पाण्याविना तडफडतोय. आम्ही टॉवरमध्ये राहतो, पण आमच्याकडे पाणीच नाही. मागच्या महिन्यात महापालिकेने पाण्याची लाईन कापून टाकली. बिल्डरने पाण्याची अधिकृत लाईन तुम्हाला दिलीच नव्हती, असं पालिकेने सांगितल्यावर धक्काच बसला. त्यांनी दिलेलं पाणी कुठून तरी चोरलं होतं. बिल्डरने मालमत्ता करसुद्धा भरला नाही. तो भरल्याशिवाय आम्हाला अधिकृतरित्या पाणी मिळणार नाही असं पालिकेने सांगितलं."

हेही वाचा : 'परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र कणखरपणे उभा'

पोलिसांची घेतली मदत तरीही..

"अभिनेते अविनाश नारकर यांच्या ओळखीतून आम्ही खासदार गोपाळ शेट्टी यांना भेटलो. त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही पोलिसांत तक्रार केली. आमच्या तक्रारीनंतर इथल्या एसपींनी बिल्डरच्या माणसाला सक्त ताकिदसुद्धा दिली. तरीही काही फरक पडला नाही. इमारतीत राहणाऱ्यांनी मालमत्ता कर भरावा असं बिल्डर म्हणतोय. २०१३ पासून बिल्डरने मालमत्ता कर भरलेला नाही. तो भरला तरच आम्हाला पाणी मिळेल. फ्लॅट घेतानाच प्रत्येकाने पाण्याच्या कनेक्शनसाठी ९८ हजार रुपये भरले होते. आता पुन्हा का आम्ही पैसे द्यायचे", असा सवाल समीरने केला.