Samir Choughule: "नैराश्याने भरलेल्या जीवनात नकळतपणे...", चाहत्याच्या घराच्या भिंतीवर फोटो बघताच समीर भावूक

चाहत्याने घरात लावला समीर चौगुलेंचा फोटो. समीर भावूक होऊन म्हणातात...
marathi actor samir choughule emotioal post after his portrait at fan home
marathi actor samir choughule emotioal post after his portrait at fan home SAKAL

Samir Choughule News: अभिनेते समीर चौगुले हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. समीर सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत.

समीर चौगुले सोशल मीडियावर अनेकदा सक्रीय असतात. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये एका फॅनने त्यांचा फोटो भिंतीवर लावला आहे. त्यामुळे समीर भावूक झाले आहेत. काय म्हणाले समीर? वाचा पुढे.

(marathi actor samir choughule emotioal post after his portrait at fan home)

marathi actor samir choughule emotioal post after his portrait at fan home
Ira Khan Wedding: आमिर खानने गाणं गाऊन केली लेकीची पाठवणी, उदयपूरमध्ये आयरा - नुपूरचं थाटामाटात लग्न

समीर चौगुले लिहीतात, "हे असे चाहते आहेत म्हणून जगण्याला अर्थ आहे...लहानपणी माझ्या घराच्या भिंतीवर मी माझ्या आवडत्या हीरोजचे फोटो लावायचो... अमिताभ बच्चन, ब्रूस ली, जॅकी चॅन, पुल देशपांडे, चार्ली चॅप्लिन (द कीड), कपिल देव यांचा (८३ चा वर्ल्ड कप उचललेला) असे अनेक फोटो माझ्या घराच्या भिंतीवर, गद्रेच्या लोखंडी कपाटावर असायचे..तेंव्हा खरंच वाटलं नव्हत कोणी माझा फोटो आपल्या घराच्या भिंतीवर लावेल....निखिल माने या माझ्या चाहत्याने माझ्या प्रेमापोटी माझे चित्र (हस्त आणि हसत चित्र) आपल्या घरातील भिंतीवर लावले आहे..."

समीर चौगुले पुढे लिहीतात, "माझ्यासाठी ही अत्यंतिक आनंदाची बाब आहे...स्ट्रेस आणि नैराश्याने भरलेल्या जीवनात आपण नकळतपणे अनेकांच्या मनाला उभारी, positivity, आनंद मिळण्याचे निमित्त ठरतो ही गोष्ट कधी कधी गहिवरून टाकते...आणि चाहत्यांचे प्रेम गुदमरवून टाकत... हास्याची ताकद किती मोठी आहे याची प्रचिती देणारी असंख्य उदाहरणे आम्ही हास्यजत्रेकरी रोज अनुभवतो...हे असे चाहते आणि त्यांचे प्रेम आमची कामाप्रती responsibility वाढवतात आणि विनोदाकडे जास्त गांभीर्याने पाहायला लावतात."

समीर चौगुले शेवटी लिहीतात, "प्रत्येक प्रहसनात ५०० टक्के योगदान द्यायची उर्मी निर्माण करतात...प्रत्येक प्रयत्न सफल होतोच असं नाही..कधी उन्नीस बीस होतच...पण १०० टक्के प्रयत्न आणि मेहेनत करण्यात आम्ही कधीच compromise करत नाही...हे संपूर्ण श्रेय आमच्या हास्यजत्रेच्या कुटुंबाचे आहे...आणि आमच्या सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांचे ..तसेच सोनी मराठी या वाहिनीचे आहे...मी श्री. निखिल माने Nikhil Mane यांचे मनापासून आभार मानतो..खूप खूप प्रेम.." 

समीरच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांचं कमेंट करुन अभिनंदन केलंय आणि कौतुकाचा वर्षाव केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com