'ट्रोलिंग मान्य मात्र...'आईवरुन दिली शिवी अन् सिद्धार्थची सटकली! पोस्ट व्हायरल Siddharth Jadhav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Siddharth Jadhav:

Siddharth Jadhav: 'ट्रोलिंग मान्य मात्र...'आईवरुन दिली शिवी अन् सिद्धार्थची सटकली! पोस्ट व्हायरल

अभिनेता आणि कॉमेडियन सिद्धार्थ जाधव आता कोणत्याही परिचयावर अवलंबून नाही. मराठी मनोरंजनच्या दुनियेत ते एक प्रसिद्ध नाव आहे. याशिवाय तो अनेक चित्रपटांमध्येही दिसला आहे.

सिद्धार्थ जाधव हा मराठी मनोरंजन विश्वातील खुप जॉली पर्सन आहे. तो नेहमी आनंदी असतो आणि त्याच्या चाहत्यांना हसवत असतो. त्याचा इंडस्ट्रीत दरारा आहेस मात्र त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांची संख्याही तितकीच आहे.

आजवर नाटक आणि चित्रपटातून त्याने अभिमनयाने चाहत्यांना भुरळ घातलीच शिवाय बॉलीवूडलाही वेड लावले. तो नेहमीच चर्चेत असतो.

मात्र तुम्ही जितके चर्चेत असतात. तुमची जितकी लोकप्रियता असते तुमच्यावर तितकिच टिका देखील होते असचं काहीच चित्र सध्याच्या सोशल मिडियाच्या युगात दिसत. सिद्धार्थ सोशल मिडियावर खुप सक्रिय आहे. तो त्याचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेयर करत असतो. त्याचे अनेक व्हिडिओ हे व्हायरल देखील होत असतात. त्याचवेळी त्याला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो.

सिद्धार्थ सहसा ट्रोलिंगवर लक्ष देत नाही. त्याला नेहमीच त्याच्या दिसण्यावरून ट्रोल केलं जात. मात्र तो त्यांना गांभीर्याने घेत नाही. त्याचबरोबर तो ट्रोल करणाऱ्यांना देखील मजेशीर रिप्लायही देतो. मात्र आता जरा अतीच झालं. एका नेटकऱ्यांने सिद्धार्थच्या व्हिडिओवर कमेंट करतांना हद्दच केली. ज्यामुळे सिद्धार्थ चांगलाच भडकला. मात्र तरीही सिद्धार्थने अतिशय शांतपणे या प्रकरणाला हाताळले आणि ट्रोलर्सलाही सुनावले.

सध्या सिद्धार्थ लंडनला आहे. तो त्याच्या मुलीसोबत तिथे सुटी घालवत आहे. दरम्यान त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत त्याने कमेंटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे.

या कमेंटमध्ये त्या नेटकऱ्याने सिद्धार्थला शिवी दिली होती. तर सिद्धार्थने ती पोस्ट शेयर करण्याबरोबरच 'ट्रोलिंग मान्य आहे, पण शिवी देणं कितपत योग्य आहे? फक्त विचारतोय', अशी सणसणीत उत्तर दिल आहे. सध्या सिद्धार्थच्या या पोस्टची चर्चा सुरु झाली आहे.

नेटकरी त्या ट्रोल करणाऱ्यांनी जरा भान ठेवाव. आपण कुणाला काय बोलतोय. त्याची ओळख काय आहे आणि तो आपलं मनोरंजन करण्यासाठी किती मेहनत घेतो याच थोडं भान ठेवण्याचा सल्ला सिद्धार्थचे चाहते देत आहेत.

टॅग्स :Siddarth Jadhavtrolled