Sumeet Pusavale: धक्कादायक..! इंस्टाचे फॉलोवर्स कमी असल्याने मराठी अभिनेत्याला सिनेमातुन काढलं

गेली चार वर्ष बाळुमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतून सुमित प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे
sumeet pusavale, sumeet pusavale news, sumeet pusavale wife,  sumeet pusavale family
sumeet pusavale, sumeet pusavale news, sumeet pusavale wife, sumeet pusavale familySAKAL
Updated on

Sumeet Pusavale News: आजकाल मराठी मनोरंजन विश्वातून अनेक धक्कदायक प्रकार समोर येत आहेत. नुकताच मराठी अभिनेत्याविषयी एक अजब प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हा प्रकार घडलाय बाळुमामाच्या नावानं चांगभलं (Balumamachya Navana Changbhala) मालिकेतील सुमित पुसावळे सोबत. सुमितला एका सिनेमातून काढून टाकण्यात आलंय. आणि कारण काहीतरी वेगळंच आहे.

( Marathi actor Sumeet Pusavale was removed from the film due to low Instagram followers)

हेही वाचा: शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

गेली जवळपास चार वर्ष बाळुमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतून सुमित प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण सुमितला त्याचे इंस्टाग्राम फॉलोवर्स कमी असल्याने सिनेमातून काढण्यात आलंय.

सुमितने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केलाय. या घटनेमुळे सुमित प्रचंड दुःखी झालाय. बघूया काय घडलंय नेमकं प्रकरण..

sumeet pusavale, sumeet pusavale news, sumeet pusavale wife,  sumeet pusavale family
Prajakta Mali: मनसेच्या नवीन गाण्यावर बिनधास्त थिरकली प्राजक्ता.. व्हिडिओ तुफान व्हायरल

सुमितने नुकतीच एका सिनेमासाठी आणि म्युझिक व्हिडीओसाठी ऑडिशन दिली होती. या ऑडिशननंतर त्याची निवडही करण्यात आली.

पण त्यानंतर सिनेमा आणि म्युझिक व्हिडिओच्या संबंधित लोकांनी सुमितचं सोशल मीडिया अकाउंट चेक केलं आणि त्यावरील सुमितचे फॉलोवर्स पाहिले. सुमितचे फॉलोवर्स कमी असल्याने त्याला सिनेमातून काढण्यात आलं.

सुमितला या गोष्टीचा मला खूप धक्का बसला असून त्याला खूप दुःख झालंय. सोशल मीडिया फॉलोवर्स कमी असल्याने त्याला नकार दिल्याने तो व्यथित झालाय. दुर्दैवाने आता कलाकाराचं भविष्य सोशल मीडिया ठरवायला लागलंय.

याविषयी सुमितने त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला, "तुम्ही किती चांगलं काम करता यापेक्षा तुमचे सोशल मीडियावर किती फॉलोवर्स आहेत हे जास्त महत्वाचं आहे. हे खूपच वाईट आहे.

आता मी जास्तीत जास्त व्हिडीओ आणि रील सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा प्रयत्न करतोय, कारण आता फॉलोवर्स वाढवणं गरजेचं आहे असं मला वाटू लागलंय.” असं म्हणत सुमितने त्याच्या भावना व्यक्त केल्यात.

sumeet pusavale, sumeet pusavale news, sumeet pusavale wife,  sumeet pusavale family
Riteish - Genelia Deshmukh: 'वेड'च्या यशानंतर रितेश - जिनीलीयाची न्यू यॉर्कवारी.. ओपन बसमध्ये झाले रोमँटिक!

कलर्स मराठीवरील 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे सुमित पुसावळे.

सूमित पुसावळेने मोनिका महाजन सोबत १४ डिसेंबरला लग्न केलं. लग्नानंतर सुद्धा सुमित पुसावळेने चर्चेत आहे. सुमित बायकोसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com