'मी माझ्या बापाचे नाव लावतो'; विक्रम गोखले कुणाबाबत म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'मी माझ्या बापाचे नाव लावतो'; विक्रम गोखले कुणाबाबत म्हणाले?
'मी माझ्या बापाचे नाव लावतो'; विक्रम गोखले कुणाबाबत म्हणाले?

'मी माझ्या बापाचे नाव लावतो'; विक्रम गोखले कुणाबाबत म्हणाले?

sakal_logo
By
टीम इ सकाळ

बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनौतची बाजू घेणं प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांना महागात पडले होते. त्यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली होती. त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोलही केले होते. त्यांच्यावर वेगवेगळ्या स्तरांतून टीका व्हायला सुरुवात झाली. अनेक कलावंतांनी देखील गोखले यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अखेर गोखले यांनी स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेत आपण जी वक्तव्ये केली त्यावर खुलासा केला आहे. ते काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.

गेल्या दोन ते तीन आठवड्यांपूर्वी बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या आर्यनची चर्चा होती. त्याला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं अटक केली. आता तो जामीनावर बाहेर आला आहे. यासगळ्या प्रकरणी बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींनी त्याच्यावर प्रतिक्रियाही दिली होती. विक्रम गोखले यांच्या पंच्याहत्तरीनिमित्तानं त्यांनी आपल्या भाषणामध्ये देशाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले होते. त्यात त्यांनी कंगनानं देशाच्या स्वातंत्र्याविषीय केलेल्या वक्तव्याचाही समावेश होता. याशिवाय आर्यन खान प्रकरणावर गोखले यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी त्यावेळी आर्यन खानवर टीका केली होती. ते म्हणाले होते, देशावर गोळी खात जो जवान शहीद होतो तो आपल्यासाठी हिरो आहे. आर्यन खान नाही. तसेच शाहरुख खान आपलं काहीही वाकडं करु शकत नाही. अशी प्रतिक्रिया गोखले यांनी दिली होती.

आता गोखले यांनी पुन्हा आर्यन प्रकरणावर आपले विचार व्यक्त केले आहेत. यावेळी देखील त्यांनी संतप्तपणे त्याच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, आर्यन खान आणि शाहरुख खान बाबत जे चालू आहे ते क्षुल्लक आहे. त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. मुळातच माझ्या जन्मदिनी ड्रग्ज या विषयावर प्रश्न का विचारण्यात आला हेच समजत नाही. शाहरुखचं नव्हे तर बॉलिवूड मधला कोणीही माझं काही बिघडवू शकत नाही. मी माझ्या बापाचं नाव लावतो. आर्यन खान हा अय्यंत फालतू विषय होता. असं गोखले यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय 21 वर्षांचा मुलगा जो बॉर्डरवर उभा राहतो आणि दहशतवादाला गोळीनं मारतो तो माझा नायक आहे. शाहरुख नाही आणि आर्यन पण नाही.

हेही वाचा: "विक्रम गोखलेंवर बोलण्याची तुझी पात्रता आहे का?'; स्वराला नेटकऱ्यांनी सुनावलं

हेही वाचा: कंगना काय चुकीचं बोलली, माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखले

loading image
go to top