Viral Song : 'चंद्रमुखी'च्या दिलखेचक अदा: अमृतावर कौतुकाचा वर्षाव

मराठी साहित्यातील प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील (Vishwas Patil) लिखित चंद्रमुखी (Chandramukhi Movie) या कादंबरीवर आधारित चंद्रमुखी चित्रपटाची निर्मिती होणार आहे.
Chandramukhi Movies
Chandramukhi Moviesesakal

Marathi Movies: मराठी साहित्यातील प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील (Vishwas Patil) लिखित चंद्रमुखी (Chandramukhi Movie) या कादंबरीवर आधारित चंद्रमुखी चित्रपटाची निर्मिती होणार आहे. त्याचे काम सुरु आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या व्हायरल झालेल्या टीझरला आणि पोस्टर रिलिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. टीझर पाहिल्यापासून प्रेक्षकांना उत्सुकता होती ती म्हणजे चंद्रमुखी आहे कोण?, ओक (Marathi Entertainment News) यांनी या चित्रपटातील पहिलं गाणं सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकुर यांनी चंद्रमुखीसाठी लिहिलेल्या गीतांना मराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गीतकार अजय अतुल यांनी संगीत दिलं आहे. तर बॉलीवूडमधील आघाडीची गायिका श्रेया घोषाल यांच्या स्वरसाजानं ते गीत सजलं आहे. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या नृत्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटसही दिल्या आहेत. दुसरं म्हणजे अमृतानं देखील तिच्या इंस्टावरुन एक पोस्ट शेयर करत त्यात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यातून तिनं तिच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. ती म्हणजे तिच्या आगामी चंद्रमुखी चित्रपटातील पहिलं गाणं व्हायरल झालं आहे. दुसरीकडे अमृताची जवळची मैत्रीण अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्यासाठी लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

Chandramukhi Movies
Video Viral: का होतोय करण जोहरचा 'ब्रम्हास्त्र' सोशल मीडियावर ट्रेंड?

चंद्रमुखीमध्ये आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात 'खासदार दौलत देशमाने' ही भूमिका अभिनेता आदिनाथ कोठारे साकारत आहे. ( adinath kothare) या आधी एक खास प्रोमोतून आदिनाथची ओळख करून देण्यात आली होती. राजकारणात मुरलेला नेता खासदार दौलत देशमाने आणि लावणी कलावंत 'चंद्रा' ची ही प्रेमकहाणी आहे. त्यामुळे आदिनाथ कोठारे याने 'चंद्रमुखी'चा चेहरा सर्वांसमोर उघड केला. यावेळी ३५ फुटी पोस्टरवर लावण्यवती चंद्रा म्हणजेच अमृताचे छायाचित्र लावण्यात आले होते. सध्या हे पोस्टर समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com