

Jhalak Dikhhla Jaa 10 News: माधुरीचं नाव ऐकताच तिच्या चाहत्यांच्या डोळ्यांसमोर वेगवेगळ्या अदा समोर यायला लागतात. बॉलीवूडमध्ये आपल्या (Bollywood Actress) अभिनयानं, त्याहीपेक्षा डान्सनं प्रेक्षकांना जिंकून घेणाऱ्या माधुरीचा जलवा अजुनही कायम आहे. ती वेगवेगळ्या रियॅलिटी शो मधून (marathi actress) चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. सध्या सोशल मीडियावर माधुरी आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरचा डान्स व्हायरल होताना दिसतोय. त्याची चर्चाही आहे. तो व्हिडिओ अमृतानं तिच्या इंस्टावरुन पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्ऱ्यांनी तिला भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. तो व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. यापूर्वी देखील अमृताच्या कित्येक व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली होती.
झलक दिखला जा हा शो टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये लोकप्रिय आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. सध्या त्याच्या नव्या सीझनची चर्चा आहे. त्याचे प्रमोशन जोरदारपणे सुरु आहे. अशावेळी अमृता खानविलकर आणि माधुरीच्या व्हिडिओचा प्रोमो व्हायरल करण्यात आला असून त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मालिकेच्या मेकर्सनं या मालिकेतील जज कोण असणार याविषयी प्रोमोतून माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे. अमृता या मालिकेत एक स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. तिनं माधुरीसोबत तिचा अनुभव कसा होता याविषयी सोशल मीडियावरुन सांगितलं आहे.
अमृतानं जे व्हिडिओ शेयर केले आहे त्यात ती माधुरी सोबत थिरकताना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी या दोन्ही अभिनेत्रींमध्ये तुलना करण्यास सुरुवात केली आहे. अमृता म्हणते की, ती आता बॉलीवूडच्या धकधक गर्ल माधुरीसोबत डान्स करायला तयार झाली आहे. अमृताचा लूक प्रेक्षकांना भावला आहे. तिनं पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा केली असून ती चाहत्यांना कमालीची आवडली आहे. काहींनी तर चंद्रमुखी म्हणून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृतानं सोशल मीडियावर तो व्हिडिओ शेयर करताना त्याला एक मोठी कॅप्शनही लिहिली आहे. बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत डान्स करण्याची संधी मिळते आहे याचा आनंद असल्याचे अमृतानं म्हटले आहे. हाच तो दिवस आणि हाच तो क्षण जो मला सर्वाधिक प्रिय आहे. ज्याची मी आतुरतेनं वाट पाहत होते. पुण्याची एक छोटीशी मुलगी जी गणेश उत्सवांमध्ये डान्स करायची ती आज एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आहे. त्यात माधुरीसोबत डान्स करण्याची संधी... हे सारं माझ्यासाठी स्वप्नवत असल्याचे अमृतानं म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.