Boycott Laal Singh Chaddha: ट्रोलर्सवर करिना भडकली, 'ही अशी लोकं जी...'| Kareena Kapoor angry on trollers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boycott Laal Singh Chaddha news

Boycott Laal Singh Chaddha: ट्रोलर्सवर करिना भडकली, 'ही अशी लोकं जी...'

Laal Singh Chaddha: लाल सिंग चढ्ढावरील वाद काही संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही. नेटकऱ्यांनी त्याच्यावर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. काल आमिर खानचा बहुचर्चित असा लाल सिंग चढ्ढा प्रदर्शित झाला होता. मात्र (Bollywood movies) त्याला काही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आमिरनं प्रेक्षकांची माफी मागुनही प्रेक्षकांनी त्याला आणि त्याच्या चित्रपटाला नाकारल्याचे (Bollywood Actor Aamir Khan) दिसून आले आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंग चढ्ढावर बहिष्कार घालण्याची मागणी गेल्या दिवसांपासून होत आहे. केवळ आमिरच्याच नाहीतर अक्षयच्या रक्षाबंधनवर देखील बहिष्कार घालण्यात यावा असे नेटीझन्स म्हणत आहे. यासगळ्यावर बॉलीवूडची बेबो करिना भडकली आहे.

लाल सिंग चढ्ढाच्या निमित्तानं बेबो सगळीकडे मुलाखती देत फिरत आहे. (Boycott Bollywood Movies) त्यावेळी तिनं ट्रोलर्सला सडतोड उत्तर दिलं आहे. आमिरनं भलेही माफी मागितली असेल मात्र आम्ही त्याचा चित्रपट पाहणार नाही. असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. आतापर्यत आमिरच्या कोणत्याही चित्रपटाला एवढा थंड प्रतिसाद मिळाला नाही जेवढा तो लाल सिंग चढ्ढाला मिळाला आहे. त्याच्या तुलनेत अक्षयचा रक्षाबंधन लक्ष वेधून घेतो आहे. मात्र त्याच्यावर देखील बहिष्काराची भाषा नेटकरी बोलू लागले आहे. यासगळ्यांना करिनानं झापले आमिरचा लाल सिंग चढ्ढा हा हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंपवर आधारित आहे. जो 1994 मध्ये आला होता.

हॉलीवूडच्या चित्रपटात टॉम हँक्स नावाच्या अभिनेत्यानं मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाला पाच ऑस्करही होती. आमिरला या चित्रपटाची भुरळ पडली. गेल्या अनेक वर्षांपासून तो या चित्रपटावर कलाकृती तयार करण्याचा विचार करत होता. काल त्याचा लाल सिंग चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र त्यावरुन सोशल मीडियावर होणारा वाद काही संपायला तयार नाही. त्यावर करिनानं आता प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते, काही विशिष्ट लोकांचा गट आहे जो नेहमीच अशाप्रकारे ट्रोल करत असतो. त्यामुळे आपण त्यांच्याकडे फारसे लक्ष देऊ नये. त्यांना वास्तव काय आहे याविषयी माहिती नसते.

हेही वाचा: Rakshabandhan Review: 'रक्षाबंधन' पाहायला जातायं सोबत रुमाल हवाच!

कायम दुसऱ्यांना नावं ठेवणारा असा एक टक्के नेटकरी आहे. त्याला तुम्ही काहीही करा हे आवडत नाही. त्याचे काम हे टीका करणे हे आहे. आमिरच्या चित्रपटाला हीच लोकं नावं ठेवत आहे. हे मला आवर्जुन सांगायचे आहे. प्रत्यक्षात चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जे सुरु आहे त्यामुळे वेगळ्याच प्रकारची वातावरण निर्मिती होत आहे. नेटकऱ्यांनी लाल सिंग चढ्ढाला बॉयकॉट करण्यात काहीही अर्थ नाही. ती एक सुंदर फिल्म आहे. प्रेक्षकांनी त्याचा आनंद घ्यायला हवा.. असं करिनानं म्हटलं आहे.

हेही वाचा: Darling Review: 'दैवं देतं कर्म नेतं' सांगणारा 'डार्लिंग', आलियाची कमाल!