Video:अमृता खानविलकर का घेतीय जिममध्ये मेहनत?

टीम ई-सकाळ
रविवार, 8 सप्टेंबर 2019

मेघना गुलझारच्या राझीमध्ये अमृता खानविलकरनं केलेली मुनिरा असले किंवा, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमात तिनं अभिनेत्री संध्या यांची केलेली छोटी भूमिका असेल. या भूमिकांनी तिच्या असा एक चाहता वर्ग तयार झाला आहे. अमृता सुरुवातीपासूनच आपल्या फिटनेसकडं खूप बारकाईनं लक्ष देते.

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. हिंदी-मराठी सिनेमांमध्ये तिनं आपला ठसा उमटवलाय. केवळ मराठीच नव्हे तर, अमराठी नागरिकही तिचे मोठे फॅन आहेत. मेघना गुलझारच्या राझीमध्ये तिनं केलेली मुनिरा असले किंवा, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमात तिनं अभिनेत्री संध्या यांची केलेली छोटी भूमिका असेल. या भूमिकांनी तिच्या असा एक चाहता वर्ग तयार झाला आहे. अमृता सुरुवातीपासूनच आपल्या फिटनेसकडं खूप बारकाईनं लक्ष देते.

आणखी वाचा : अभिनेत्री म्हणाली, चांद्रयानाऐवजी भारताने शौचालयेच बांधावीत!

अमृताला हवंय सेल्फ मोटिवेशन
अमृता सध्या फिटनेस ट्रेनर वैशाली भोईरकडं ट्रेनिंग घेत आहे. अमृतानं नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआऊट करतानाच एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात ती मेहनत घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिनं, सेल्फ मोटिवेशनसाठी शेअर केल्याचं म्हटलंय. अमृताला पाहिल्यानंतरच ती फिटनेससाठी कोणतिही तडजोड करत नसल्याचं स्पष्ट दिसतं.

अमृतानं योगाचंही शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलंय.

अमृता खतरोंके खिलाडीमध्ये?
खतरोंके खिलाडीच्या दहाव्या सिझनमध्ये कोण कोण असणार याची घोषणा नुकतीच झालीय. त्यात करिश्मा तन्नासह अमृता खानविलकर हे नाव असल्यानं अमृताच्या चाहत्यांना आनंद झालाय. खतरोंके खिलाडी हा खूपच आव्हानात्मक रिअॅलिटी शो आहे. त्यासाठी चांगली तयारी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच कदाचित अमृता खानिवलकर जीममध्ये मेहनत घेताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi actress amruta khanvilkar workout session in gym instagram video