Valentine Day 2023: या टोपीखाली दडलंय काय? बॉयफ्रेंडचं चुंबन घेण्यासाठी मराठी अभिनेत्रीची अनोखी पद्धत

मराठी अभिनेत्रीने चुंबन करण्याची अनोखी पद्धत शोधून काढली आहे
bhagyashree mote, valentine day
bhagyashree mote, valentine daySAKAL

Valentine Day 2023: आज प्रेमाचा दिवस.. अर्थात व्हॅलेन्टाईन डे.. व्हॅलेंटाईन डेला कोणी गार्डन मध्ये, कुणी झाडाझुडुपात, कुणी निसर्गाच्या सानिध्यात, तर कुणी घरबसल्या आपल्या जोडीदारासोबत हा दिवस मजेत घालवत असतात.

मराठी सेलिब्रटी सुद्धा या दिवशी त्याच्या पार्टनर सोबत प्रेमाचा दिवस मजेत घालवत आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्रीने चुंबन करण्याची अनोखी पद्धत शोधून काढली आहे.

bhagyashree mote, valentine day
Ved Movie: 'पठाण' येऊन गेला पण 'वेड' टिकून राहिलाय.. ४५ दिवसानंतर विक्रमी कमाई

डोक्यावर टोपी घालत मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉयफ्रेंडला किस केलंय. हि अभिनेत्री आहे भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote). भाग्यश्रीने सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंडसोबतच हा खास फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केलाय.

भाग्यश्रीने तिचा बॉयफ्रेंड विजय पालंडे सोबत हा खास फोटो पोस्ट केलाय. या टोपीखाली दडलंय काय? असंच या फोटोकडे बघून म्हणावं वाटतं. भाग्यश्रीचा हा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

(Bhagyashree Mote romantic photo viral she kiss her boyfriend)

भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे हॉट फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसतात. बोल्ड आणि हॉट फोटोंमुळं तिला अनेकदा ट्रोल केलं जातं. पण ती याकडं दुर्लक्ष करते. भाग्यश्रीच्या पर्सनल आयुष्याची अनेकदा चर्चा झाली.

पण तिनं तिच्या खासगी आयुष्याबद्दल कधीच काही लपवलं नाही. काही महिन्यांपू्र्वी तिनं विजय पालंडे सोबत ती रिलेशनशीप मध्ये आहे याचा खुलासा केलेला.

bhagyashree mote, valentine day
Valentine Day: लोअर परेलच्या ब्रिजवर भर गर्दीत गुडघ्यावर बसून अंकुशने दीपाला प्रपोज केलं आणि....

विजय पलांडे हा मेकअप आर्टिस्ट असून त्याने हृतिक रोशन सोबत अनेक प्रसिद्ध कलाकारांचा मेकअप डिझाईनर म्हणून काम केलंय. काहीच दिवसांपूर्वी दोघांचा साखरपुडा झाला. भाग्यश्रीच्या फॅन्ससाठी हे मोठंच सरप्राइझ होतं.

भाग्यश्री आणि विजय अनेकदा सोशल मीडियावर कपल गोल दाखवत असतात. भाग्यश्रीने देवा श्री गणेशा, देवयानी अशा मालिकांमध्ये याशिवाय मराठी आणि साऊथ सिनेमांमध्ये अभिनय केलाय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com