Video: 'आता तरी येईल ना अक्कल..', व्हिडिओ शेअर करत धनश्री काडगावकरने सांगितलं दुःख Dhanashri Kadgaonkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Actress Dhanashri Kadgaonkar Video, 'Tu Chal Pudhe' Actress

Video: 'आता तरी येईल ना अक्कल..', व्हिडिओ शेअर करत धनश्री काडगावकरने सांगितलं दुःख

Dhanashri Kadgaonkar Video: 'वहिनीसाहेब' म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. धनश्री सोशल मीडियावर ही चांगलीच सक्रिय असते. नुकताच धनश्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात धनश्री एका हॉटेलमध्ये जेवताना दिसतेय. या व्हिडिओत धनश्रीला जेवताना पाहून ही कोणती नवी जेवायची स्टाईल? असा प्रश्न तुम्हालाही पडेल. तर या प्रश्नाचं उत्तर धनश्रीने तिच्या व्हिडिओत तसंच कॅप्शन मधून शेअर केलंय. (Marathi Actress Dhanashri Kadgaonkar Video, 'Tu Chal Pudhe' Actress)

या व्हिडिओत धनश्री एका हॉटेलमध्ये आपल्या मित्रासोबत संवाद साधत जेवताना दिसतेय. व्हिडिओत तिला मित्र काही प्रश्न विचारतोय. ज्यात तिने सांगितलं की अक्कलदाढ काढल्यामुळे तिला एका बाजूने जेवावं लागतंय. अक्कलदाढ काढली असली तरी माझं शहाणपण गेलेलं नाही असं धनश्री तिच्या मित्राला सांगत आह. 'चार लोकात बसून तू अशी जेवतेय हे मला ॲडजस्ट करावं लागतंय' असं म्हणत तिच्या मित्राने खिल्ली उडवली. यावर धनश्री म्हणते वेदनेमुळे हसणं देखील कठीण झालं असतानाही मी चाहत्यांच्यासोबत फोटो काढत आहे.

तर कॅप्शन मध्ये धनश्रीने लिहिलं, ' तुमच्या आयुष्यात आहेत का असे काही मित्र जे विचारतात, अक्कलदाढ काढली आता तरी येईल ना अक्कल? किंवा अक्कलदाढ काढल्यामुळे सगळी अक्कल पण गेली का?' असे टिपिकल प्रश्न तुमच्या मित्रांनीही विचारलेत का? असं तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. बालदिनाच्या दिवशी धनश्रीनं हा व्हिडीओ पोस्ट केला होता.

हेही वाचा: Varun Dhawan:'चाहतीच्या मदतीसाठी धावून गेला वरुण, कार्यक्रम थांबवला अन्..', सोशल मीडियावर Video Viral

धनश्रीने आजवर अनेक मराठी मालिकांमधून काम केलं आहे. तर 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतील तिच्या वहिनीसाहेब या भूमिकेला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती.