Varun Dhawan:'चाहतीच्या मदतीसाठी धावून गेला वरुण, कार्यक्रम थांबवला अन्..', सोशल मीडियावर Video Viral Bhediya Movie actor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Varun Dhawan stops 'Bhediya' promotional event to help a fan

Varun Dhawan:'चाहतीच्या मदतीसाठी धावून गेला वरुण, कार्यक्रम थांबवला अन्..', सोशल मीडियावर Video Viral

Varun Dhawan: बॉलीवूड अभिनेता वरूण धवनचे लाखो चाहते आहेत. खास करून तरुणींमध्ये वरूणची मोठी क्रेझ पाहायला मिळते. लवकरच तो 'भेडिया' या सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या वरूण आणि अभिनेत्री क्रिती सेनन त्यांच्या 'भेडिया' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकतेच दोघेही जयपूर मध्ये गेले होते. एका कॉलेजमध्ये 'भेडिया'चं प्रमोशन सुरू असताना वरूण एका तरुणीच्या मदतीला धावून गेलेला दिसून आला. या इव्हेंटमधील त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून नेटकरी वरूणचे कौतुक करत आहेत. (Varun Dhawan stops 'Bhediya' promotional event to help a fan)

हेही वाचा: Mahesh Babu ला पितृशोक, दोन महिन्यापूर्वीच आईनंही घेतला होता अखरेचा श्वास...

जयपुर मधील या इव्हेंटचा एक व्हिडिओ वरूण धवनच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. यात क्रिती सेनन स्टेजवर उभी असल्याचं दिसतंय. तिने हिरव्या रंगाचे गाऊन परिधान केलेय. तर वरूणने डेनिमवर टी-शर्ट आणि रंगीत जॅकेट परिधान केलंय. व्हिडिओत एक तरुणी स्टेजखाली जमिनीवर बसल्याचं दिसून येतंय. तर वरूण स्वतः तिला बाटलीने पाणी पाजत आहे. इव्हेंट सुरू असताना एका तरुणीला भोवळ आल्याने वरूणने कार्यक्रम थांबवत स्टेजवरून खाली उतरून या तरुणीची मदत केली. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर वरूणच मोठं कौतुक होतंय.

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर एका फॅनने कमेंट करत लिहिले, 'किती गोड आहे हा. वरूण एक उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय तो एक व्यक्ती म्हणून देखील खूप चांगला आहे यात शंकाच नाही.' आणखी एका युजरने लिहिलंय "तो खरोखरच खूप ग्रेट आहे माझा VD'. तर आणखी एका युजरने लिहिलं "तो खूप दयाळू आहे".

दरम्यान वरुण आणि क्रितीचा 'भेडिया' हा सिनेमा 25 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा असून अमर कौशिक यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेय. शिवाय सिनेमात श्रद्धा कपूरही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.