
Manasi Naik: 'माझा हा सर्वात मोठा निर्णय...',मानसीच्या नव्या पोस्टवर चाहत्यांची चर्चा
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तसेच मानसी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम डान्सरसुद्धा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसी नाईक आपल्या डान्सची झलक चाहत्यांना दाखवत असते. सध्या मानसी नाईक आपल्या खाजगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आली आहे. पती प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याने चाहते आश्यर्य चकित झाले आहेत. सध्या मानसी प्रदीप खरेरा पासून वेगळी राहात आहे.
बॉक्सर प्रदीप खरेरासोबत मानसीने लग्नगाठ बांधली होती. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा लग्नानंतर एकमेकांसोबत खूप आनंदी होते. त्याबरोबरच दोघे सोशल मीडियावर देखील सतत अॅक्टिव्ह असायचे. ते दोघे त्यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करायचे. तसेच दोघे सोबत रील्सदेखील बनवायचे. एवढंच नाही तर मानसी आणि प्रदीप एकमेकांच्या फोटोंवर देखील प्रेमळ कमेंट्स करायचे. मानसीने सर्व काही सुरळीत सुरु असताना अचानक तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन प्रदीपसोबतचे सर्व फोटो हटवल्याने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आले होते.
हेही वाचा: Hollywood: रोमिओ-ज्युलिएटने तरुणपणातील लैंगिक अत्याचाराचा म्हातारपणात केला खुलासा..
मानसीने फोटो हटवल्यानंतर स्वतः या वृत्तांना दुजोरा दिला आहे. तसेच प्रदीप खरेरासोबत विभक्त होण्याचा निर्णय घेत मानसीने घटस्फोट अर्जदेखील दाखल केला आहे. मानसी नाईक या प्रकारानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर मानसीला काहींनी पाठिंबा देत तिचे कौतुक केलंय तर काहींनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील केले आहे. मानसी नाईकची सध्या एक नवी पोस्ट खूप व्हायरल होत आहे. पाहूया काय आहे नेमकी ती पोस्ट.
मानसी नाईकने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. मानसीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. त्याचबरोबर मानसीने फोटोंना दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मानसीने फोटो पोस्ट करत लिहिले, 'तरीही.. मी घेतलेला सर्वोत्कृष्ट निर्णय... स्वतःचे आणि स्वतःच्या शांततेचे रक्षण करा'. असे कॅप्शन देत मानसीने घटस्फोटाच्या निर्णयाकडे इशारा केल्याचे नेटकऱ्यांचे म्हणने आहे.मानसी नाईकने फोटोला दिलेल्या या कॅप्शनला थेट तिच्या घटस्फोटाच्या निर्णयाशी जोडले जात आहे. सोशल मीडियावर मानसीची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आली आहे.