esakal | अवघ्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्रीने घेतलं हक्काचं घर
sakal

बोलून बातमी शोधा

monalisa bagal

अवघ्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्रीने घेतलं हक्काचं घर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात आपले स्वतःचे नाव, अस्तित्व निर्माण केल्यावर अनेकांची इच्छा असते की आपलं स्वतःचं, आपल्या कष्टातून उभं राहिलेलं आणि आपल्या हक्काचं असं घर असावं. अनेकांनी हक्काच्या घराचं स्वप्न पाहिलेलं असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते. 'इच्छा तिथे मार्ग' असं म्हटलेलंच आहे आणि अभिनेत्री मोनालीसा बागलच्या Monalisa Bagal आयुष्यातही असंच काहीसं घडलंय. मोनालीसा आत्तापर्यंत अनेक मराठी सिनेमा, मालिकेतून, वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. गेल्या वर्षी तिचा 'गस्त' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाच्या निमित्ताने तिने पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली. (marathi actress monalisa bagal bought a new home at the age of 25)

मोनालीसाचे सोशल मीडियावरील फोटोदेखील चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कारण अवघ्या २५ व्या वर्षी मोनालीसाने स्वत:च्या कमाईतून हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. एवढ्या कमी वयात तिने घेतलेली उंच भरारी यासाठी तिचे विशेष कौतुक झाले. ही उंच भरारी घेण्यामागे ती तिच्या कुटुंबाला श्रेय देते.

हेही वाचा: सोनाली कुलकर्णीची आफ्रिका 'सफारी'

घरासंबंधीची सोशल मीडियावर पोस्ट लिहिताना तिने म्हटले की, "माझं स्वतःचं घर असावं ही माझी इच्छा होती आणि ती आता पूर्ण झाली आहे, मात्र एका गोष्टीची खंत वाटते की माझ्यासोबत जिने हे स्वप्न पाहिले ती माझी आई आज आता माझ्यासोबत नाही. पण आई गेल्या नंतर माझी काकू 'पन्ना हेमंत राणे' हिने मला आधार दिला. आई नंतर आईसारखं कोणी माझ्यावर प्रेम केलं असेल तर ती माझी काकू. माझे स्वप्न पूर्ण होण्यात, माझ्या करिअरमध्ये काकूचा देखील मोलाचा वाटा आहे. असं म्हणतात ना की 'कुटुंब हेच सर्वकाही असतं' आणि माझे आई-वडील दोघेही नसताना मला कुटुंबासारखंच प्रेम काका, काकूंनी दिलं. ते दोघेही माझे आधारस्तंभ आहेत.'

loading image