'आपल्या आवडीनिवडी मुलांवर लादता कशासाठी?'

अभिनय क्षेत्रातील करिअर या विषयावर अभिनेत्री मृण्मयीन देशपांडे हिने मार्गदर्शन केले.
actress munmayee deshpande
actress munmayee deshpandeTeam esakal

पुणे - : पुणे जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने कला विषयावर आधारित शासकीय कोरोना बाबत तसेच शालेय तासिका सांभाळून ही मोफत ऑनलाईन व्याख्यानमाला सलग 25 आठवडे सुरु ठेवणे ही अद्वितीय अशीच बाब आहे. हे कलाध्यापक अभिनंदनास नक्कीच पात्र आहेत. पालकांनो मुलांवर आपल्या इच्छा आकांक्षा लादू नका. त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर घडवू द्या. असे मत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (marathi actress mrunmayee deshpande) हिने यावेळी व्यक्त केले. (marathi actress mrunmayee deshpande address to parents dont be overburrden on child )

पुणे जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने कला विषयक "अभिनय क्षेत्रातील करीयर (carrer in acting field) कसे कराल" या विषयावरील 25 व्या रौप्यमहोत्सवी ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ती बोलत होती. मागील वर्षी पासून सुरु झालेल्या कोरोना काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र शाळा बंद शिक्षण सुरु या नियोजनांतर्गत कला विषय वगळून या शिक्षणात मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सा. शास्त्रे आदी विषयांच्या तासिका तयार करुन शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरु केले. शालेय तासिकांमध्ये कलाध्यापकांनाही वरीलपैकी काही विषय अध्यापनास दिले गेले होते.

munmayee deshpande
munmayee deshpandeTeam esakal

या विषयांबरोबरच आपल्या कला विषयाचेही अध्यापन व्हावे या उद्देशाने पुणे जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने दर शनिवारी सायंकाळी 7 ते 8 :30 या वेळेत चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन, हस्तकला आदी कला विषयक तज्ञ मार्गदर्शकांचे सप्रात्यक्षिक झुम ॲपद्वारे कलाप्रेमी विद्यार्थी, पालक व कलाध्यापक यांच्यासाठी ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. आजपर्यंत सलग सातत्याने 25 आठवडे ही कला विषयक ऑनलाइन व्याख्यानमाला सुरु आहे.

"अभिनय क्षेत्रात करीयर कसे कराल" या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेला निमंत्रित करण्यात आले होते. मुलाखत स्वरुपात असलेल्या या व्याख्यान प्रसंगी मृण्मयीनं रेणूका स्वरुप शाळेतील आपले जीवन, अभिनय क्षेत्रातील आपली वाटचाल व मुलांनी अभिनय क्षेत्रात करीयर कसे करावे या विषयावर आपले विचार व्यक्त केले.

actress munmayee deshpande
कोरोनात पैसे संपले, अभिनेत्याच्या पत्नीनं सांगितलं वास्तव
actress munmayee deshpande
अँजेलिनाचं अजब फोटोशुट, अंगावर सगळ्या मधमाशा....

यावेळी राज्य कलाध्यापक महामंडळाचे विविध जिल्ह्यातील काही वि. उपाध्यक्ष, वि. सहकार्यवाह, जिल्हा तालुका, शहर अध्यक्ष, सचिव आदी पदाधिकारी यांसह राज्यातील सुमारे 450 हून अधिक कलाध्यापक, कलाप्रेमी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com