अँजेलिनाचं अजब फोटोशुट, अंगावर सगळ्या मधमाशा....

आपल्या हटक्या अभिनय़ामुळे अँजेलिनाचा चाहतावर्ग जगभर पसरला आहे.
angelina jolie photoshoot
angelina jolie photoshoot national geographic

मुंबई - हॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री अँजेलिना जोली (hollywood actress angelina jolie ) तिच्या हटकेपणासाठी प्रसिध्द आहे. तिनं यापूर्वी देखील आपल्या वेगवेगळ्या फोटोशूटनं (photoshoot) सर्वांना धक्का दिला आहे. आताही तिचं एक अजब - गजब फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अँजेलिना तिच्या सामाजिक कामांसाठीही ओळखली जाते. याशिवाय तिचं वैयक्तिक आयुष्यही मोठं वादळी राहिलं आहे. (hollywood actress angelina jolie photoshoot on world bees day with national geographic)

सध्या अँजेलिनाचं एक आगळं वेगळं फोटोशुट तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यात तिच्या अंगावर मधमाशा आहेत. त्या 18 मिनिटांपर्यत असल्याची माहिती संबंधित फोटोशूट करणा-या संकेतस्थळानं दिलीय. आपल्या हटक्या अभिनय़ामुळे प्रचंड लोकप्रिय अँजेलिनाचा चाहतावर्ग जगभर पसरला आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी ती नेहमी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. याचे कारण तिच्याभोवती असलेलं ग्लॅमर. तिचं फोटोशूट चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणीच असते.

अँजेलिना (hollywood actress angelina jolie photoshoot) यावेळी चर्चेत आली आहे ते तिच्या वेगळ्या फोटोमुळे. त्या फोटोमध्ये तिच्या अंगावर मधमाशा बसलेल्या दिसत आहेत. तिनं अशाप्रकारचे फोटोशुट का केलं असा सवालही तिचे काही चाहते तिला विचारत आहेत. जागतिक मधुमक्षिका दिनाच्या निमित्तानं तिनं हे फोटोशूट केलं आहे. त्यानिमित्तानं तिला जगाला एक संदेश द्यायचा होता. तो पर्यावरणपूरक असा होता. त्या मधमाशा डॅन विन्स्टर्स यांच्या होत्या. ते मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय करतात.

angelina jolie photoshoot
'कोरोनाचं भान ठेवा, फोटोशुट कसलं करताय, संवेदनशील व्हा'
angelina jolie photoshoot
तेजस्विनीचं वाढदिवसानिमित्त चाहत्यांना गिफ्ट

हे फोटोशूट नॅशनल जिओग्राफिकच्या (national geographic) सहकार्यातून करण्यात आले होते. यात विशेष बाब म्हणजे यावेळी अँजेलिनाच्या अंगावर 18 मिनिटांपर्यत मधमाशा होत्या. त्यांच्याकडून अँजेलिनाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहचू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. असंही सुत्रांनी सांगितले. नॅशनल जिओग्राफीकच्या वतीनं अँजेलिनाचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com