'२६/११ च्या त्या भयंकर रात्री मी..' मृण्मयी देशपांडेचा थरारक किस्सा..

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने ही खास आठवण.
mrunmayee deshpande birthday
mrunmayee deshpande birthdaysakal

Mrunmayee deshpande birthday : नाविन्यपूर्ण भूमिकेतून कायमच प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारऱ्या अभिनेत्री मृण्मयी देशपांचे हिचा आज वाढदिवस. मृण्मयीकडे (mrunmayee deshpande) असलेली अभिनयाची जाण, भूमिकेवरील पकड ही तिच्या अभिनयाला अधिकच वर घेऊन जाते. तिच्या सर्व भूमिका चाहत्यांचा लक्षात राहिलेल्या आहेत. मग ते झी मराठी वरील 'कुंकू' या मालिकेतील तिची भूमिका असो, अग्निहोत्र किंवा मग आता सूत्रसंचालक म्हणून तिने 'सारेगमप' मध्ये केलेली धमाल असो. केवळ मालिकाच नाही नाही तर नाटक आणि चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'कट्यार काळजात घुसली', 'नटसम्राट' ते शेर शिवराज मधील 'केसर' अशा तिची अनेक रूपं रसिकांनी पाहिली आणि त्यांना भावलीही. मृण्मयीने गेल्यावर्षी '२६/११' ही वेब सिरीज केली होती. त्या दरम्यान तिने त्या भयाण रात्रीचा किस्सा एका मुलाखतीती सांगितला होता. (happy birthday mrunmayee deshpande)

mrunmayee deshpande birthday
हेमांगी कवी तब्बल सोळा तास होती झोपेत.. जाणून घ्या नेमकं काय घडलंय?

काही प्रसंग किंवा काही घटना अशा असतात की त्या आपण कधीही विसरू शकत नाही. ज्यांनी ते अनुभवलं आहे ते कायमच त्या घटनेशी जोडलेले असतात. त्याचे परिणाम आणि पडसाद हे बराच काळ जाणवतात. अशीच एक घटना म्हणजे २६/११ चा दहशतवादी हल्ला. 'या दिवसाची आठवण काढली तरी काळजात धडकी भरते. हा दहशतवादी हल्ला कधीच संपून गेला पण त्याची दहशत मात्र अजूनही मनावर आहे.' असे मृण्मयीने एका मुलाखतीत सांगितले.

'26/11 अतिरेकी हल्ल्यावेळी मी पुण्यातच होते, एका मालिकेचं चित्रीकरण सुरु होतं. तेव्हा मुंबईत हल्ला झाला हे कानावर आलं. मुंबई पुण्यापासून फारशी दूर नाही हे ठाऊक होतं. शारीरिक दृष्टीनं आम्ही त्यावेळी मुंबईबाहेर असलो तरीही महाराष्ट्राचा प्राण असणाऱ्या, देशाचा जीव असणाऱ्या मुंबईबाबत चिंता वाटत होती. त्यावेळी नातेवाईकांना, मित्रमंडळींना आम्ही फोन करत होतो, चिंतेनं चौकशी करत होतो. सातत्यानं टीव्हीवर घडामोडी पाहत होतो. ती एक भयंकर रात्र होती, ज्या रात्रीनंतर, त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांनंतर साऱ्यांचं आयुष्य बदललं होतं. मुंबईतील परिस्थिती बदलली होती. या वेब सिरीजच्या निमित्ताने तो प्रसंग, ती रात्र मला पुन्हा अनुभवता आली. कदाचित वेगळ्या दृष्टिकोनातून मी या हल्ल्याकडे पाहू शकले. त्या रात्री घडलेला थरार पुन्हा साकारताना अक्षरशः अंगावर काटा आला होता, अशी आठवण मृण्मयीने सांगितली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com