esakal | नेहा म्हणे, आता मला काहीही फरक पडत नाही

बोलून बातमी शोधा

neha pendse news of trolling }

मराठी अभिनेत्री नेहानं गेल्या वर्षी जानेवारी मध्ये शार्दुल बयासशी लग्न केले  होते.

manoranjan
नेहा म्हणे, आता मला काहीही फरक पडत नाही
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री नेहा पेंडसेला नेटक-यांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. अशावेळी त्यांना जास्त प्रत्युत्तर न करण्याचा निर्णय तिनं घेतला होता. मात्र नेटक-यांचे ट्रोल करणे वाढले आहे. अशावेळी त्यांच्याकडे लक्ष न देणे हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे नेहानं म्हटलं आहे. सध्या ज्या मालिकेत नेहा काम करते आहे त्यातील भूमिकेवरुन तिला ट्रोल केले जात असल्याची चर्चा आहे. याविषयी तिनं एका मुलाखतीत सांगितले होते की, मी माझे काम करत आहे. अनेकांना आपले काम आवडेल किंवा आवडणार नाही. तसेच प्रेक्षकांची जी प्रतिक्रिया आहे त्याला सामोरं जाण्याची ताकद कलावंतामध्ये असायला हवी.

मराठी अभिनेत्री नेहानं गेल्या वर्षी जानेवारी मध्ये शार्दुल बयासशी लग्न केले  होते. तेव्हापासून ती चर्चेत आली. काही दिवसांपासून ती ट्रोल होत आहे. शार्दुलचे दोन विवाह झाले आहेत. त्याला एक मुलगाही आहे. त्यामुळे त्याला नेटकरी ट्रोल करत असतात. नेहानं त्यावरुन आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे. मला अशाप्रकारच्या ट्रोलिंगचे काही वाटत नाही. मी अजून काही थांबलेले नाही. जे आहे त्याला सामोरं जायची ताकद आपण ठेवायला हवी.

नेहा म्हणाली, मला असे वाटते की लोकांचे बोलणे कधी संपणार नाही. लोक एकमेकांना काही सांगतच आहे मात्र माझे पती आम्ही दोघांनी अशा प्रकारच्या लोकांकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग निवडला आहे. त्याचे काय आहे की, ट्रोलिंगमुळे माझ्या पतींना खुप त्रास झाला आहे. कारण त्यांना त्याची सवय नाही. मात्र आता आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही.नेहा आता भाभीजी घर पर है या मालिकेत सौम्या टंडनच्या रिप्लेस म्हणून काम करत आहे. ती अनिता भाभीजीची भूमिका साकारत आहे. अनेकांनी तिची तुलना सौम्याशी केली आहे. त्यामुळे नेहाला टीकेला सामोरं जावं लागलं आहे.