
मला सगळ्या गोष्टी कळतायत असं नाही. पण अशा जोडप्यानं एखादं मुल दत्तक घेतलं तरी त्या मुलाच्या मानवी, हक्कांचं काय? हा प्रश्नच उभा राहतोच ना?
मुंबई - मराठीतील प्रख्यात अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या निशिगंधा वाड या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्या वादात अडकण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी एलजीबीटी समूहा विरोधात वक्तव्य केले आहे. त्यावरून त्या ट्रोल झाल्या आहेत. अर्थात त्यांना मोठया प्रमाणावर विरोध झाल्यानंतर त्यांनी आपण केलेल्या वक्तव्याची माफीही मागितली आहे. अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. 'दिल के करीब' या मुलाखतीतच्या कार्यक्रमाअंतर्गत सुलेखा तळवलकर यांनी निशिगंधा वाड यांची मुलाखत घेतली होती.
या मुलाखतीत वाड यांनी एलजीबीटी याविषयावर वेगळी मांडणी करताना त्यातून वाद निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचे दिसून आले आहे. त्यावरून संबंधित समलैंगिक संबंधांसंदर्भात त्यांची भूमिका मांडली. यानंतर त्यांच्यावर टीका झाली आहे. त्या या मुलाखतीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. आपलंच कौतुक करण्यापेक्षा जरा वेगळ्या विषयावर बोलू,असं निशिगंधा म्हणाल्या, 'मला ना निसर्गाच्या विरोधात जाणारा अनैसर्गिक प्रवास थोडा पचनी नाही पडत समलिंगी संबंधाबाबत माझं वैयक्तिक मत थोडं वेगळं आहे.
माझ्या मुलीला मी या विषयावर बोललेलं आवडत नाहीए. आताच्या पिढीला असं वाटतं की हाऊ कॅन यू कॉन्ट्रॅडिक्ट? (तुम्ही विरोधी मत कसं मांडू शकता) तुम्ही नॉर्मल नाहीत का?. प्रत्येकाला वैयक्तिक आवडीनिवडी प्राधान्य आहे. प्रत्येकाला निवडीचा अधिकार आहे, पण उपचार पण आहेत की...'असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. आपण अशा लोकांबद्दल आपण मानवी हक्कांबद्दल बोलतो. मला सगळ्या गोष्टी कळतायत असं नाही. पण अशा जोडप्यानं एखादं मुल दत्तक घेतलं तरी त्या मुलाच्या मानवी, हक्कांचं काय? हा प्रश्नच उभा राहतोच ना?
उर्वशीने आईला दिला बर्थ डे निमित्ताने 'गोल्ड प्लेटेड" केक
समजा अशा कुटूंबाने एखाद्या मुलाला दत्तक घेतले तर त्या मुलांच्या मानवी हक्कांचं काय? त्यांना ह्यूमन राईट्सबद्दल समजेपर्यंत ते गोंधळेली नसतील का? शेवटी त्यांच्या वक्तव्यावरून निशिगंधा यांनी माफी मागितली आहे. 'एलजीबीटीक्यू समूह किंवा कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. माझ्या वक्तव्यामुळं कोणी दुखावलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते',असं त्या म्हणाल्या.'मी सामाजिक क्षेत्रात काम करतेय तृतीयपंथींसोबतही काम चालतं. मला कोणावरही आरोप करण्याचा हेतू नव्हता. गे असणं, लेस्बियन असणं ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यासंदर्भात मी बोलू शकत नाही. होमोफोबिया अशी माझी मनोवृत्ती देखील नाही, असं डॉ. निशिगंधा यांनी सांगितले.