
निवेदिता आणि अशोक सराफ यांचा रोमँटिक Video व्हायरल
गेल्या दोन दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतील हीट ज्येष्ठ जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ चांगलीच चर्चेत आली आहे. या दोघांकडे एक आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. निवेदिता सराफा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या वैयक्तीक आयुष्याबद्दल काही ना काही शेअर करत असतात. अशातच काल त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबतच्या रोमँटिक क्षणांना आठवणींचा उजाळा दिला आहे.
निवेदिता यांनी आपल्या इंस्टाग्रामवर अशोक सराफ यांच्यासोबत फेका फेकी या सिनेमातील एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या व्हिडीओला 'सामने ये कौन आया दिल में हुई हलचल..' या रोमँटिक गाण्याची जोड दिली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट करत लाईक्सचा वर्षाव केला आहे. 'इतक ideal couple आहात ना की तुम्हाला पाहून नात कसं असाव', 'एक नंबर जोडी' अशा विविध कमेंट्स त्यांच्या या व्हिडीओला येत आहेत.
दोघांच्यात तब्बल 18 वर्षांचा फरक
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या दोघांच्यात तब्बल 18 वर्षांचा फरक आहे. दोघांची ‘डार्लिंग डार्लिंग’ ह्या नाटकावेळी पहिली भेट झाली होती. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ ह्या चित्रपटांत अशोक सराफ आणि निवेदिता जोशी हे दोघेही कलाकार होते. त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांचे एकमेकांशी कधीच बोलणे झाले नाही. हा चित्रपट लोकांना खूप आवडला. आणि ह्या चित्रपटापासूनच ह्या दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली.
धुमधडाका’ चित्रपटावेळी दोघेही एकमेकांशी बोलू लागले. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. आणि काही काळानंतर ह्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर घरातील नातेवाईक, खास मित्रमंडळी आणि काही मोजकेच लोकं ह्यांच्या उपस्थित दोघांचाही विवाह गोव्यातील मंगेशी देवीच्या मंदिरात घरगुती पद्धतीने पार पडला.
Web Title: Marathi Actress Nivedita Saraf And Ashok Saraf Romantic Video
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..