PHOTOS : पूजा सावंतचं या हँडसम अभिनेत्यासोबत जुळलं?

टीम ईसकाळ
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पूजाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चर्चांना उधाण आलंय. मराठी हँडसम अभिनेत्याला ती डेट करतीय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'जंगली' चित्रपटात चक्क माहुताची भूमिका साकारलेली म्हणून सगळ्यांच्याच लक्षात राहिलेली अभिनेत्री म्हणजेच पूजा सावंत... मराठी चित्रपटसृष्टीत तर तिने नाव कमावलंच याशिवाय हिंदीतही तिने एण्ट्री घेतली आहे.  पण सध्या तिच्याबाबत एक वेगळीच चर्चा होतीय ते म्हणजे तिच्या लव्हलाईफविषयी... तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चर्चांना उधाण आलंय. मराठी हँडसम अभिनेत्याला ती डेट करतीय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

रिंकूला पाहण्यासाठी जमा झालं गावं अन् पुढे झालं असं...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It’s my wonderland @shruu_t Dolled up @vrushti_harkare

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

पूजाने आपल्या इन्स्टाग्राम 'रोज डे'निमित्त दोन क्यूट फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये ती आणि अभिनेता भूषण प्रधान यांनी मस्त पोझ दिल्या आहेत. तसेच भूषणनेही हे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. त्यांच्या या फोटोशूटमुळे त्यांच्यात सुंदरसं नातं फुलतंय अशी चर्चा होत आहे. एका फोटोत पूजा भूषणला गुलाबांनी मारतीये आणि तो तिच्याकडे प्रेमाने बघतोय. या फोटोला तिने 'Hey rose, Happy rose day' आणि भूषणने याच फोटोला 'मी वाट बघेन, तू मला तुझ्या प्रेमाने ठार कर' असं कॅप्शन दिलंय. 

चित्रडोसा : रजनीकांतांचे राजकारण!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hey rose Happy rose day

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hold on to the rhythm of the season A surprise is worth the wait

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

तसेच दुसऱ्या फोटोला भूषणने कॅप्शन दिलंय की, 'तुम्हाला याचं उत्तर हवंय? तर मग थोडे दिवस थांबा...' तर पूजाने त्यांच्या फोटोला 'सरप्राईजची वाट बघा' असं कॅप्शन दिलंय. यावरुन त्यांच्यात काहीतरी शिजतंय हे नक्की.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Do you need an answer? Can you wait for few more days?

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on

सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट केल्यानंतर त्या दोघांचेही चाहते खूश झालेत. चाहत्यांनी या जोडीचे कौतुक केलंय, तर काही नेटकऱ्यांनी हे चित्रपटाचे प्रमोशन असू शकते अशी आशा व्यक्त केली आहे. आता खरे काय ते पूजा-भूषणलाच माहीत!    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi actress Pooja sawant possibility to date Bhushan Pradhan