'हनिमूनला गेलेलं कपल अजून काय करणार..', '36 गुण' सिनेमातील बोल्ड सीनवर स्पष्टच बोलली पूर्वा पवार ... Purva Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Actress Purva Pawar Podcase. Sakal Exclusive, 36 Goon Marathi movie

'हनिमूनला गेलेलं कपल अजून काय करणार..', '36 गुण' सिनेमातील बोल्ड सीनवर स्पष्टच बोलली पूर्वा पवार ...

Purva Pawar: समित कक्कड दिग्दर्शित '३६ गुण' सिनेमाच्या ट्रेलरची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या सिनेमात अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करतेय पूर्वा पवार. नाटक, मालिका, सिनेमा, मॉडेलिंग अशा विविध प्लॅटफॉर्मवर वावरलेली पूर्वा अनेक दिवसांनी मोठ्या पडद्यावर '३६ गुण' सिनेमाच्या माध्यमातून दिसणार आहे. अभिनेते प्रमोद पवार यांची मुलगी असूनही तिनं आपली स्वतंत्र ओळख इंडस्ट्रीत केली आहे. सिनेमातील तिचं बिनधास्त वागणं, बोल्ड सीन्स आणि एकंदरीत लग्न या महत्त्वाच्या विषयावरचं तिचं थेट मत तिनं सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत बोलून दाखवत दिलखुलास संवाद साधला आहे. हनिमूनविषयी, लग्नसंस्थेविषयी आणि लीव्ह-इन रिलेशन शीपविषयी बिनधास्त पूर्वाची मतं ऐकायला बातमीत जोडलेल्या पॉडकास्ट लिंकवर क्लीक करायला विसरु नका.

हेही वाचा: Viral Video: ब्रेस्टफीड प्रत्येक आई करते, पण मग सोनमचं का होतंय कौतूक?

३६ गुण हा सिनेमा लग्नसंस्थेवर भाष्य करतो. पण सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या पूर्वाचा मात्र लग्न संस्थेवर विश्वासच नाही. तिनं आपले बेधडक विचार याविषयी मांडले आहेत. तेव्हा ते ऐकण्यासाठी बातमीत जोडलेली पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.

याच मुलाखतीत पूर्वानं लीव्ह इन रिलेशनशीपवर देखील बिनधास्त भाष्य केलं आहे,तिची मतं आजच्या तरुणाईला भावतील एवढं मात्र नक्की. आपण जर कधी मनात विचार आला लग्नाचा तर लव्हमॅरेज की अरेंज मॅरेज करु याविषयी मत व्यक्त करताना पूर्वानं आपल्या भावी नवऱ्यात कोणते गुण असावेत हे देखील सांगितलं आहे बरं का. पण सध्या तरी लग्न नाहीच या मतावर आपण ठाम आहोत,भविष्यात माहित नाही असं म्हणणाऱ्या पूर्वानं अनेक इंट्रेस्टिंग गप्पा मारल्या आहेत तेव्हा बातमीत जोडलेली पूर्वा पवारची पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.