Viral Video: ब्रेस्टफीड प्रत्येक आई करते, पण मग सोनमचं का होतंय कौतूक?

सोनम कपूर सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. यादरम्यानच तिनं आपला मुलगा वायू सोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे जो भलताच व्हायरल झाला आहे.
Viral Video: Sonam Kapoor BreastFeeds Son vayu...
Viral Video: Sonam Kapoor BreastFeeds Son vayu...Instagram

Sonam kapoor: सोनम कपूर सध्या आईपण एन्जॉय करतेय. बाळाला जन्म दिल्यानंतरही तिनं आपल्या शरीराची नीट काळजी घेतलीय हे तिच्या फोटोंवरनं दिसून आलंय. करवा चौथच्या दिवशी तिनं साडीत शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या, ते तिच्या फिगर अन् लूकची प्रशंसा करताना दिसले. अर्थात करवा चौथ ती कधीच साजरा करत नाही या तिच्या मताला खूप ट्रोलही केलं गेलं. (Viral Video: Sonam Kapoor BreastFeeds Son vayu...)

Viral Video: Sonam Kapoor BreastFeeds Son vayu...
Sonam Kapoor: 'करवा चौथ व्रत करण्यापेक्षा...', सोनम कपूर स्पष्टच बोलली

तर अशी ही सोनम कपूर सध्या सिनेमात फार काही कमाल करताना दिसत नसली तरी चर्चेत मात्र या-ना त्या कारणानं असते. आता तिचा एक व्हिडीओ समोर येतोय ज्यावर चाहत्यांनी तिचं तोंडभरुन कौतूक अन् भरभरुन प्रशंसा करायला सुरुवात केली आहे. चला, जाणून घेऊया काय आहे खास या व्हिडीओत.

Viral Video: Sonam Kapoor BreastFeeds Son vayu...
KBC 14: 'चाहत्यांपासून दूर रहा', स्पर्धकानं सल्ला देताच त्यावर अमिताभचं उत्तर एक नंबर...

बॉलीवूड सिनेमांपासून भले सोनम गेल्या काही दिवसांत दूर असेल पण सोशल मीडियावर मात्र तिची तगडी फॅन फॉलॉइंग आहे. याच चाहत्यांसाठी सोनम इन्स्टाग्रामवर नेहमीच काही ना काही शेअर करत असते. आई बनल्यानंतर सोनम कपूरचं आयुष्य बदलल्याचं दिसून येत आहे. ती मुलासोबत बिझी असते पण तरिही आपल्या चाहत्यांना छोटी-छोटी अपडेट द्यायला विसरत नाही.

सोनम कपूरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ करवा चौथच्या दिवशी तिनं शूट केला आहे. व्हिडीओ मध्ये सोनम मेकअप रुममध्ये मेकअप करताना दिसत आहे. आता आपण म्हणाल यात काय मोठी गोष्ट? पण या व्हिडीओत खास आहे ते म्हणजे मेकअप रुम मध्ये सोनम आपला मुलगा वायुला ब्रेस्टफीडिंग करता-करता तयार होत आहे. ब्रेस्टफीडिंग केल्यानंतर सोनम लहंगा आणि ज्वेलरी घालून छान तयार होतानाही दिसत आहे.

Viral Video: Sonam Kapoor BreastFeeds Son vayu...
Nargis Fakhri: डिप्रेशनचा सामना करतेय 'रॉकस्टार' फेम नर्गिस फाखरी, बॉलीवूडवर आरोप करत म्हणाली...

सोनम कपूरनं मेकअप रुममधील व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की,''आपल्या टीमला भेटणं,आपल्या लोकांना भेटणं मला खूप आवडतं. मला माझ्या होमग्राऊंडमध्ये आल्यासारखं वाटत आहे. लव यू मुंबई''. सोनमच्या या व्हिडीओचं तिच्या चाहत्यांनी भलतंच कोडकौतूक केलं आहे. प्रत्येकजण सोनमला 'स्ट्रॉंग वूमन' ,'टॅलेंटेड' म्हणत प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

Viral Video: Sonam Kapoor BreastFeeds Son vayu...
Box Office: बॉलीवूडला पुन्हा बसणार फटका? मोहनलालच्या 'Monster' नं सोडलं घाबरवून...

याआधी सोनमनं करवा चौथला साडी नेसून काढलेला फोटो शेअर केला होता तेव्हा म्हटलं होतं की ती करवा चौथचं व्रत करत नाही. कारण तिच्या नवऱ्याला पसंत नाही . लग्नाच्या चार वर्षानंतर सोनमनं २० ऑगस्ट,२०२२ रोजी वायू या आपल्या मुलाला जन्म दिला. मुलाच्या नामकरण सोहळ्याच्या वेळी आनंद,सोनम आणि वायू तिघांनी पिवळ्या रंगाचे कपडे घालून खास फोटोशूट केलं होतं,आणि त्यात तिनं वायूची झलक आपल्या चाहत्यांना दाखवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com