esakal | 'शालूच्या फोटोवरील कमेंट्सवर लॉकडाऊन लावा’; नेटकऱ्यांची अजब मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

rajeshwari kharat

'शालूच्या फोटोवरील कमेंट्सवर लॉकडाऊन लावा’; नेटकऱ्यांची अजब मागणी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री राजेश्वरी खरातने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती मिळते. फॅंड्री या चित्रपटामुळे राजेश्वरीला लोकप्रियता मिळाली. फॅंड्रीमधील शालू नावाच्या एका गावातील साध्या मुलीची भूमिका राजेश्वरीने केली होती. पण आता शालू सोशल मीडियावर वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिच्या ग्लॅमरस अंदाजाने तिने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. राजेश्वरी सोशल मिडीयावर सक्रिय असते, तिच्या डान्सचे तसेच वेगवेगळ्या लूक मधील फोटोशूटचे फोटो ती सोशल मिडीयावर शेअर करत असते. पण आता या फोटोंचा त्रास काही नेटकऱ्यांना होत आहे. म्हणून ‘सरकारने सर्वात आधी शालूच्या फोटोवरील कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा’ अशी अजब मागणी सोशल मीडियावर होत आहे.

महाराष्ट्राने सरकारने सध्या 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. पण सोशल मीडियावर शालूच्या फोटोवरील कमेंट्सवर लॉकडाऊन लावाण्याची मागणी होत आहे. एका मीम्स पेजने एक भन्नाट मीम सोशल मिडीयावर शेअर केले आहे. यामध्ये लिहीले आहे की, ‘सरकारने सर्वात आधी शालूच्या फोटोवरील कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा, तिथेच जास्त गर्दी होत आहे.’ या विनोदी मीमला अनेक जणांनी लाइक केले आहे.

राजेश्वरी सध्या पुण्यात तिच्या कुटुंबासोबत राहते. कधी साडीमध्ये तर कधी बोल्ड ड्रेसमधील फोटो ती सोशल मिडीयावर शेअर करते. त्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. राजश्वरीला सोशल मीडियावर एक लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.