
कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असतात. बऱ्याचदा त्यांना ट्रोलर्सना सामोरं जावं लागतं. यामुळे सोशल मीडिया वापरणं बंद केल्याचीही अनेक उदाहरणं आहेत.
पुणे - सोशल मीडियाचा वापर सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेक मोठ्या व्यक्ती, उद्योगपती, कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असतात. बऱ्याचदा त्यांना ट्रोलर्सना सामोरं जावं लागतं. यामुळे सोशल मीडिया वापरणं बंद केल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेही याच कारणामुळे सोशल मीडियाचा वापर काही काळ थांबवला होता. आता तिने पुन्हा जोरदार कमबॅक केले असून ट्रोलर्सना इशाराच दिला आहे.
सई ताम्हणकर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुन्हा सक्रीय झाली आहे. तिने ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना इशारावजा धमकीच दिली आहे. ज्यांची काही ओळख नाही असे लोक विचार करतात की कोणाबद्दल ते काहीही लिहू शकतात. हे कधीच स्वीकारलं जाणार नाही.
I’m back on this platform almost after a few months ; if you troll me for no reason be ready to be treated the same way !
— Sai (@SaieTamhankar) January 3, 2021
सईने म्हटलं की, मी काही जवळपास काही महिन्यांनी पुन्हा सोशल मीडियावर परत आले. कोणतंही कारण नसताना जर ट्रोल करत असाल तर तुम्हाला सुद्धा तशीच वागणूक दिली जाईल असं सईने तिच्या ट्विटमध्ये स्पष्ट म्हटलं आहे.