esakal | अटक झाली नसती तर 'हा' होता राज कुंद्राचा पुढचा 'प्लॅन'
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa Raj 3

अटक झाली नसती तर 'हा' होता राज कुंद्राचा पुढचा 'प्लॅन'

sakal_logo
By
अनिश पाटील

अश्लील व्हिडीओ, वेब सिरीज बनवल्यामुळे राज कुंद्रा सध्या अटकेत

मुंबई: हॉटशॉट्स या App मार्फत पॉर्न चित्रपट प्रसारित केल्याप्रकणी अटक करण्यात आलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व उद्योगपती राज कुंद्रा 'बोलिफेम' नावाने प्लॅन बी सुरू करणार होता. त्यात पॉर्न चित्रपटाचे लाईव्ह स्क्रीनिंग करण्यात येणार होते. याबाबतचे WhatsApp चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत. राज कुंद्राचा माजी सचिव व या प्रकरणातील अटक आरोपी उमेश कामत याच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली. त्यावेळी या मोबाईलमध्ये अनेक असे चॅट्स गुन्हे शाखेच्या हाती लागले आहेत. त्यातून पॉर्नोग्राफी प्रकरणात पुढे लाईव्ह स्क्रीनिंग करण्यात येणार असल्याची माहिती उघड झाली. (Raj Kundra Case Screenshot Viral reveals he was planning for Live Streaming of adult Video)

हेही वाचा: अटक टाळण्यासाठी राज कुंद्राकडून घेतली लाच, पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

राज कुंद्रा चॅटमध्ये म्हणाला की, येणाऱ्या काळात भविष्य लाईव्ह कंटेंटचा आहे. कारण स्क्रिन रेकॉर्डिंग शक्य नाही. क्राईम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा पॉर्न शूट थांबवून मॉडेल आणि अभिनेत्रींना लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याची तयारी करत होता. हीच लाईव्ह स्ट्रिम करण्यासाठी बोलिफेमची तयारी केली जात होती. त्यामुळे आता पोलिस या प्रकरणी महत्त्वाचे पुरावे गोळा करत आहेत.

व्हायरल झालेला स्क्रीनशॉट-

Raj-Kundra-Screenshot

Raj-Kundra-Screenshot

हेही वाचा: कल्याणच्या काही भागात पूरस्थिती, उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी

दरम्यान, H अकाउंट्स नावाच्या ग्रुपमध्ये प्रदीप बक्शीने हॉटशॉट अॅप नियमांची पूर्तता न केल्यामुळे गूगलनं सस्पेंड केलं असल्याची माहिती ग्रुपमध्ये टाकली होती. त्यानंतर राज कुंद्रानं उत्तर देताना सांगितले की, काहीच हरकत नाही. प्लान बी सुरु झाला आहे. जास्तीत जास्त 2 ते 3 आठवड्यांत नवं अॅप्लिकेशन लाईव्ह होईल. राज कुंद्राचा प्लान बी म्हणजे बोलिफेम. हा प्लान राज कुंद्रानं तयार केला होता. पॉर्न इंडस्ट्रीला नव्या दिशेनं पुढे घेऊन जाण्यासाठी राज कुंद्रानं हा प्लॅन तयार केला होता. या दरम्यान, कामत आणि राज कुंद्रा या दोघांमधील आणखी एक चॅट समोर आलं, ज्यामध्ये राज कुंद्राने कामतला एक न्यूज आर्टिकल पाठवलं, या आर्टिकलमध्ये लिहिलं होतं की, पॉर्न व्हिडीओ 7 ओटीटीवर प्रसारित केल्यामुळे पोलीस 7 ओटीटी मालकांना समन्स पाठवण्याची शक्यता आहे. आपण बोलिफेमची तयारी असल्याचे कुंद्राने सांगितले. त्यावर कामत याने आपण ऑफिसमध्ये येऊन यावर चर्चा करु. तोपर्यंत आपल्याला सगळे बोल्ड कंटेंट हटवले पाहिजे, असे सांगितले.

हेही वाचा: घाट भागात जोरदार पाऊस; 24 मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द

त्यावर राज कुंद्राने शंका व्यक्त करत ते लोक ऑल्ट बालाजीचा कंटेंट हटवतील, असे वाटत नसल्याचे सांगितले. त्यावर कामत हे एवढं गंभीर नाही. ते केवळ ओबजेक्शनेवल कंटेंट काढून टाकण्यासाठी सांगतिले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे याप्रकरणी राज कुंद्राचा सक्रिय सहभाग असल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात स्पष्ट होत आहे.

loading image