ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव अल्झायमरने त्रस्त, अजिंक्य देवने केले ट्वीट

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 14 October 2020

वैशिष्टयपूर्ण अभिनयाने आपल्या नावाचा ठसा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत उमटविणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास सुरु झाला आहे. याविषयीची अधिक माहिती सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे प्रसिध्द केली आहे.

मुंबई - अजिंक्य देव यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केलेली ती पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यात त्यांनी आपली आई ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर झाल्याची माहिती दिली आहे. यानंतर चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देऊन सीमा देव लवकरात लवकर ब-या होऊ हे अशी देवाकडे प्रार्थना केली आहे. सीमा देव यांची प्रकृती अचानक खालावली आहे.

वैशिष्टयपूर्ण अभिनयाने आपल्या नावाचा ठसा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत उमटविणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास सुरु झाला आहे. याविषयीची अधिक माहिती सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे प्रसिध्द केली आहे. आई लवकर बरी होऊ दे यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं आहे. ‘माझी आई श्रीमती. सीमा देव अल्झायमरच्या आजाराने ग्रस्त आहे. आम्ही संपूर्ण देव कुटुंबीय त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. तसेच तिच्यावर प्रेम करत असणाऱ्या महाराष्ट्रातील चाहत्यांनी देखील त्या लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करा’ असं ट्विट अजिंक्य देवने या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

अभिनेत्री सीमा देव आणि त्यांचे पती अभिनेते रमेश देव हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील अतिशय नावाजलेले कलाकार आहेत. त्यांच्या ‘सुवासिनी’ , ‘जगाच्या पाठीवर’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या. त्यांचा मुलगा अजिंक्य देवही प्रसिध्द अभिनेता आहे.

साधारणपणे वयाच्या साठीनंतर हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. यालाच आपण स्मृतिभ्रंश असेही म्हणतो. वार्धक्यातील धोकादायक आणि त्रासदायक आजार म्हणून अल्झायमरचा उल्लेख करावा लागेल.  स्मृतिभ्रंशाच्या एकूण रुग्णांपैकी साधारण ५ % रुग्ण हे चाळीशी-पन्नाशीतले असतात असे एका संशोधनातून पुढे आले आहे. या मानसिक आजारात व्यक्तीच्या स्मृतीवर परिणाम  होतो. यामुळे कालांतराने त्या व्यक्तीचा स्मृतिभ्रंश होतो.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Actress Seema Deo Suffering From Alzheimer