यही अदा तो एक सितम है...

यही अदा तो एक सितम है...

तेजाब हा चित्रपट 88 मध्ये सिनेमागृहात झळकला आणि सिनेसृष्टीत पुन्हा एक दिल धडकवणाऱ्या अभिनेत्रीचे पदार्पण झाले.रेखा,जयाप्रदा,श्रीदेवी,या सौन्दर्यवान अभिनेत्री ही सृष्टी गाजवत असतांना माधुरीची एन्ट्री रसिकांना आनंददायी होती.तेजाब नंतर तिचे अनेक चित्रपट रसिकांनी डोक्‍यावर घेतलेत.तेजाब मधील डिंग डॉंग डिंग जितके लोकप्रिय झाले तेवढेच हे गाणे. 

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले हे जावेद अख्तर यांचे हे काव्य एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्याच्या भावना अधोरेखित करतं.वरवर बघता हे सहज बघितलं जाणारं प्रेमगीत वाटत असले तरी त्यातील गम्मत न्यारीच आहे,प्रेमातील उतावीळपणा,एकमेकांशिवाय जगू शकत नसल्याची तीव्र भावना,एकमेकांची मनं दुखावली असली तरी त्याची दोहोंना प्रबळ जाणीव आणि ते अनिल कपूर व माधुरी यांनी अभिनयातून या गाण्याद्वारे सिध्द करणे हे सगळं प्रेक्षणीय आणि रंजक आहे.जावेद यांच्या लेखनातील शब्दांना किशोरकुमार यांचे सुपुत्र अमितकुमार यांनी योग्य न्याय दिला,गाण्यातील भावना संगीताच्या तालावर अगदी ठेक्‍यात,ठसक्‍यात गाऊन घेण्यात लक्ष्मीकांत - प्यारेलाल कुठेही कमी पडले नाहीत त्यामुळे हे अनोखं प्रेम पडद्यावर तर फुललंच पण रसिकांना देखील प्रफुल्लित करण्यात यशस्वी झालं. अनिल कपूर यांचा रांगडा अभिनय त्याला माधुरीच्या अदांची साथ हे वेगळे कॉम्बिनेशन रसिकांना भावलं. 
माधुरी दीक्षित उत्तम कलाकार आहे हे या गाण्यातून लक्षात येतं, ते यानंतर अनेक चित्रपटातून तिने सिद्ध केलं,प्रेम प्रतिज्ञा,संगीत,प्रेमग्रंथ ही त्याची काही उदाहरणं आहेत. 

अडमधडम ओळींची सुरेल नजाकत 
गम्मत म्हणजे जावेद यांनी गाण्याची सुरुवात ज्या शब्दानी केली त्यावेळेस त्यांचे ठहराव अप्रतिम आहेत. 
वस्तुतः कह दो के तुम.. नंतरचा पॉज वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यांनतर ...हो मेरी वरना हे गाऊन घेतांना गायक व संगीतकार श्रेय घेऊन जातात. 
तसं अगदी सहज बघितलं तर हे वाक्‍य अजिबात सरळ नाही.मी आहे जात गावाला असं काहीसं ते अडमधडम आहे पण संगीतातील गोडवा अमित कुमार,अनुराधा पौडवाल यांच्या गायनातील विशिष्ट मुरक्‍यामुळे ते अडमधडम आहे हे आपण विसरून जातो. 
------------ 

तुम आज मुझसे यह एक वादा कर लो 
फिर न कोई तुम शरारत करोगे 
जितनी मोहब्बत मैं करती हूँ तुमसे 
मुझसे तुम उतनी मोहब्बत करोगे 

आता माझ्याशी, खोड्या, चेष्टा करणार नाही असे वचन देऊन मी जेवढे तुझयावर प्रेम करते तेवढं तू करावं हे माधुरीचं या गाण्यात अभिनयातून सांगणं प्रेक्षणीय आहे.या गाण्यातील यही अदा तो एक सितम है ही ओळ अख्या गाण्याचा प्राण आहे,आणि माधुरीला ती तंतोतंत लागू पडते. 
अनिल कपूर सोबत तिची केमिस्ट्री पडद्यावर सर्वांना आवडली,यात परिंदा सर्वोत्तम. 

मेलडी मेकर्स: 
कह दो के तुम.. नंतरचा पॉज वैशिष्ट्यपूर्ण 
..हो मेरी वरना हे गायनाचे गायक व संगीतकारांना श्रेय 
यही अदा तो एक सितम है.. ही ओळ अख्या गाण्याचा प्राण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com