esakal | कोरोनाशी लढणा-या योद्धांना ३२ मराठी कलाकारांची गाण्यातून मानवंदना..पहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

marathi celebs

सेलिब्रिटी देखील दररोज वेगवेगळ्या संकल्पना घेऊन लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत..अशीच एक संकल्पना तुमच्यासमोर आणली आहे ती काही मराठी सेलिब्रिटींनी..या संकल्पनेतून त्यांनी डॉक्टर्स, पोलिस, सफाई कामगार यांना तु चाल पुढे तुला रं गड्या भिती कशाची म्हणत या संकटकाळात जीवाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असलेल्या या योद्धांना गाण्यातून मानवंदना दिली आहे..या व्हिडिओमध्ये ३२ मराठी कलाकारांचा सहभाग आहे..

कोरोनाशी लढणा-या योद्धांना ३२ मराठी कलाकारांची गाण्यातून मानवंदना..पहा व्हिडिओ

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे..संपूर्ण जगावर कोरोनाव्हायरसचं संकट ओढवलं आहे..यादरम्यान प्रत्येकजण आपापल्या परिने या संसर्गापासून बचावासाठी आवाहन करताना पाहायला मिळतोय..सेलिब्रिटी देखील दररोज वेगवेगळ्या संकल्पना घेऊन लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत..अशीच एक संकल्पना तुमच्यासमोर आणली आहे ती काही मराठी सेलिब्रिटींनी..या संकल्पनेतून त्यांनी डॉक्टर्स, पोलिस, सफाई कामगार यांना तु चाल पुढे तुला रं गड्या भिती कशाची म्हणत या संकटकाळात जीवाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असलेल्या या योद्धांना गाण्यातून मानवंदना दिली आहे..

हे ही वाचा: जगभरात नावाजलेली हॉस्टेजेस वेबसिरीज खास मराठीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

आपल्या जीवाची पर्वा न करता या संकटकाळात अत्यावश्यक सेवा पुरवणा-यांचा मान राखून तरी लोकांनी घराबाहेर पडू नये, घरात बसून स्वतःचं आणि देशाचं रक्षण करावं असं आवाहन या व्हिडिओमार्फत करण्यात आलं आहे..विशेष म्हणजे हा व्हिडिओ या सेलिब्रिटींनी स्वतःच्याच घरी बसून शूट केला आहे..दिवसरात्र एक करणा-या या योद्धांचे आभार व्यक्त करणे हा या व्हिडिओमागचा खरा प्रयत्न आहे..समीर विध्वंस आणि हेमंत ढोमे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या व्हिडिओमध्ये ३२ मराठी कलाकारांचा सहभाग आहे..

अभिनेता अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, ललित प्रभाकर, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे, प्रसाद ओक, प्रविण तरडे, चिन्मय मांडलेकर, आदीनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, अभिनय बेर्डे, गश्मिर महाजनी, प्रियदर्शन जाधव, जसराज जोशी तर अभिनेत्री सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, क्षिती जोग, रिंकू राजगुरु, मृण्मयी देशपांडे, वैदेही परशुरामी, श्रेया बुगडे, अनिता दाते, मिथीला पालकर, शिवानी सुर्वे, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, सायली संजीव, हृता दुर्गुळे अशा एकुण ३२ कलाकारांनी मिळून या व्हिडिओद्वारे जनजागृती केली आहे...

काही दिवसांपूर्वीच बिग बी अमिताभ यांच्याकडून घरातंच राहा अशी जनजागृती करणारा एक आगळा वेगळा व्हिडिओ तयार केला गेला होता...विशेष म्हणजे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी देखील हा व्हिडिओ घरात राहुनच शूट केला होता..त्यामुळे सध्या कोरोनाशी लढायचं असेल तर घरात राहुनंच खुप मोलाचं सहकार्य आपण सगळे करु शकतो हाच संदेश देण्याचा सगळे प्रयत्न करत आहेत.. 

marathi celebrities giving a salute to corona warriers by tu chal pudha song video