लग्नाआधीच मराठमोळ्या सेलिब्रिटी कपलचं रोमॅंटिक फोटोशुट, पाहा फोटो

वृत्तसंस्था
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

'या' कपलने त्यांचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी इंटरनेटवर चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. 

मुंबई : बॉलिवूडमधील अनेक कपल चाहत्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये अगदी टॉपवर आहेत. असं असलं तरी मराठी सिनेसृष्टीतील कपल्सचीही तितकीच पसंती आहे. त्यामधील एक गोड कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. मराठी इन्डस्ट्रीमधील चॉकलेट बॉय सिद्धार्थ आणि मिताली बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र आता या कपलने त्यांचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी इंटरनेटवर चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. 

सिद्धार्थ आणि मिताली डेट करत आहेतच शिवाय हे कपल लग्नदेखील करणार आहेत. याच वर्षी जानेवारीमध्ये त्या दोघांचा साखरपुडा  झाला. त्यामुळे अनेकदा ते दोघं एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. हे फोटो अनेकदा इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होतात.

पुन्हा ही जोडी चर्चेमध्ये आहे कारण, सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर त्या दोघांचा रोमान्स करतानाचा फोटो शेअर केला आहे शिवाय कॅप्शनमध्ये मितालीविषयी वाटणारे फिलिंग्सही शेअर केले आहेत. 
हे फोटो पाहिल्यावर सिद्दार्थ आणि मितली कपल गोल्स असल्याचं मत चाहत्यांनी व्यक्त केलं आहे. या रोमॅंटिक फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या क्युट कपलचे फोटो कोण्या रोमॅंटिक चित्रपटामधील सिन्सपेक्षा कमी नाहीत. हे फोटो पाहिल्यावर लक्षात येते की हे कपल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत.

विशेष म्हणजे सिद्धार्थ आणि मिताली लवकरच एका ऑस्ट्रेलियन चित्रपटामध्ये एकत्र दिसत आहेत. त्यासाठी ते दोघं ऑस्ट्रेलियामध्ये रवाना झाले असून एक महिना तिथेच राहणार आहेत. ऑस्ट्रेलियातील आलोक राव या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना सिद्धार्थ म्हणाला,' या चित्रपटामध्ये तुम्हाला रोड ट्रिपविषयीची कथा पाहायला मिळेल. शिवाय हा एक फॅमिली ड्रामा असेल.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

To the Harry Potter marathon that never happened. #5C102 #bebinca #tinypanda

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

सिद्धार्थने क्लासमेट, वजनदार, गुलाबजामुन, झेंडा, मिस यु मिस्टर असे सुपरहिट सिनेमे केले. तर, मिताली शाहरुख खानच्या बिल्लू या चित्रपटामध्ये झळकली होती. तर, 2015 मध्ये तिने 'उर्फी' या चित्रपटामध्येही काम केलं. छोट्या पडद्यावर झी युवाच्या 'फ्रेशर' या मालिकेतही दिसली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

The flowery goodness. . . Both of us styled by @shivanipatil_

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

सप्टेंबरला सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं होतं आणि जानेवारीमध्ये त्यांनी साखरपुडाही केला. आता हे दोघ लग्न कधी करणार याची उत्सुकता चाहत्यांमध्य आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi celebrity giving major couple goals with romantic photo shoot before marriage