Akshaya-Hardik अक्षया होणार आता 'होम मिनिस्टर '! 'राणादा आणि अंजलीची' पहिली मकर संक्रांत दणक्यात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshaya-Hardik

Akshaya-Hardik अक्षया होणार आता 'होम मिनिस्टर '! 'राणादा आणि अंजलीची' पहिली मकर संक्रांत दणक्यात...

तुझ्यात  जीव रंगला’ या सुप्रसिद्ध मालिकेतील अंजलीबाई आणि राणादाच्या जोडी म्हणजेच अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे खऱ्या-खुऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार झाले आहेत आहेत. गेल्या वर्षी २ डिसेंबरला या दोघांचा लग्न सोहळा आनंदात पार पाडला.

मालिका संपून आज दोन वर्षे झाले असले तरी सुद्धा आजही मालिकेतील त्यांचे व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या व्हिडीओवर नेटकरी आणि त्यांचे चाहते अजूनही सुंदर कमेंट्स करत असतात.

हेही वाचा: Prajakta Mali: प्राजूची हवा! सोनू सुदलाही प्राजक्ताच्या कौतुकाचा मोह आवरेना..

आता पुन्हा एकदा हि जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हार्दिक आणि अक्षया हे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. मात्र, यावेळी मालिकेसाठी नाही तर झी मराठीवर 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसणार आहेत. लग्नानंतर पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत ते परिवारासोबत साजरा करणार आहेत.

हेही वाचा: Bigg Boss 16: भारती-हर्षचा बिगबॉसच्या घरात दंगा! सलमानला बनवलं मुलाचा बेबी सीटर..

महिला वर्गात विशेष लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे 'होम मिनीस्टर' केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर तमाम देशभरातील महिलांचा या कार्यक्रमाद्वारे सन्मान करण्यात आला त्यामुळे आज हा प्रचंड लोकप्रिय शो असल्याचं पाहायला मिळतं. तर सगळ्यांचे‌ आदेश भाऊजी या वेळी राणादा आणि अंजलीबाई बरोबर खेळणार आहेत.

झी मराठीवर 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसणार आहेत. यावेळी अक्षया आणि हार्दिक वेगवेगळे मजेशीर खेळ खेळतांना दिसणार आहेत. चाहतेही याचा पुरेपुर आनंद घेत पाहता येणार आहे.

हेही वाचा: पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये हार्दिक आणि अक्षया हे आदेश बांदेकर यांच्यासोबत गप्पा मारतांना दिसत आहेत. ते वेगवेगळे गेम खेळतायत.आदेश बांदेकर हे अक्षयाला एक पैठणी देखील भेट म्हणून देतात.

हार्दिक आणि अक्षय यांनी हजेरी लावलेला हा एपिसोड 15 जानेवारी रोजी मकर संक्रांती निमित्तानं दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होणार आहे.