
हृषिकेश - प्रियदर्शन निघाले 'छुपे रुस्तम', असं काय केलं दोघांनी?
Marathi News: मराठी नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मराठी मनोरंजन विश्वात आपल्या विनोदी भूमिकेनं प्रेक्षकांना निखळ आनंद देणारे दोन दिग्गज (Marathi Drama) अभिनेते एकाच कलाकृतीतून समोर येणार आहे. लेखन, दिग्दर्शन आणि (entertainment news) अभिनय अशा तीनही प्रांतात मुशाफिरी करत अभिनेते हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांनी आजवर प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन केले आहे. सध्या मात्र नाटयवर्तुळात हे दोघेही छुपे रूस्तम असल्याची चर्चा रंगली आहे? या दोघांना छुपे रूस्तम का म्हटंल जातय? नेमकी कोणती भानगड या दोघांनी केली आहे.
प्रवेश व दिशा निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित हे दोन अंकी नाटक १५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव ही जोडगोळी एकत्र येणार म्हणजे काहीतरी खुमासदार असणार हे वेगळं सांगायला नको. फार्स, गंमत, गॅासिप लपवाछपवी अशा सगळ्या गोष्टींनी हे नाटक रंगत जात. खास विजय केंकरे टच असलेल्या या नाटकात काम करणे ही आमच्यासाठी पर्वणी असल्याचे हे दोघे सांगतात.
शंभर टक्के खरं कधीच कोणी बोलत नसतं. प्रत्येकजण काही ना काही लपवाछपवी करत असतो. ही लपवाछपवी जर नवरा बायको मधली असेल तर मग सगळा मामला कठीण होऊन बसतो. नवरा बायकोच्या नात्यातील लपवाछपवीचा हा खेळ आणि त्यातून उडणारी तारांबळ, तारेवरची कसरत, झालेली गोची याची सगळी धमाल म्हणजे ‘छुपे रुस्तम’ हे नाटक. ‘द लाय’ या फ्रेंच नाटकावर हे नाटक बेतलं आहे. हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव या दोघांसोबत मयूरा रानडे आणि कृष्णा राजशेखर या नाटकात काम करतायेत. विनोदाचा डोस देत नवरा बायकोच्या नात्यातील अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न ‘छुपे रुस्तम’ हे नाटक करतं. ? या सगळ्याचा खुलासा येत्या १५ मे ला होणार आहे. हे दोन्ही हरहुन्नरी अभिनेते आगामी ‘छुपे रुस्तम’ या नाटकासाठी एकत्र आले आहेत.
हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही
प्रिया पाटील आणि अनिता महाजन यांनी ‘छुपे रुस्तम’ नाटकाची निर्मीती केली आहे. या आधी या संस्थेच्या वतीने विविध व्यावसायिक नाट्यस्पर्धे मध्ये गाजलेलं ‘गलती से मिस्टेक’ या धम्माल विनोदी नाटकासोबत ज्वलंत, आशयघन व विनोदाची हळूवार फुंकर घालणारं ‘डोन्ट वरी हो जाएगा’ यासारख्या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. लेखक तेजस रानडे यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे तर संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे.
हेही वाचा: पत्नी अनुष्का शर्मासोबत विराट कोहली पोहोचला जिममध्ये -Video Viral
Web Title: Marathi Drama Chuppe Roustom Hrishikesh Joshi Priyadarshan Post Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..