ग्लोबल आडगाव : गावच नसेल तर... गावांच्या उद्धवस्तीकरणाच्या विरोधातला प्रभावी लढा!

गावं जगली पाहिजेत!
Global Aadgaon Marathi Film
Global Aadgaon Marathi FilmSakal

जसंजसं जगात तंत्रज्ञान वाढत गेलं तसतशा अनेक गोष्टी लोप पावत गेल्या. आधुनिकीकरणाचा सर्वांत फटका बसला तो निसर्गाला. शहराच्या आजूबाजूला अनेक विकासकामे झाली पण त्यानंतर तेथील स्थानिक शेतकऱ्यांना आणि मजूरांना उघड्यावर यावं लागलं हा आपला इतिहास आहे. ज्या मातीचा गंध आपण लावलाय त्या मातीला विसरून कसं चालेल...

हे खेडे टिकले पाहिजेत, शेतकरी टिकला पाहिजे यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहिलेल्या पंढरीची कथा अनिलकुमार साळवे यांनी 'ग्लोबल आडगाव' या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलीये. सिल्व्हर ओक फिल्म्स अॅन्ड इंटरटेनमेंट आणि मनोज कदम यांनी निर्मित केलेला चित्रपट नुकताच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला आहे.

चित्रपटाची सुरूवातंच अंगावर येते. ओसाड माळरानावरून गाव सोडून जाणाऱ्या उपऱ्या गावकऱ्यांची रांग जेव्हा दिसते तेव्हा काळजात धडकी भरते. चित्रपटाचा एकंदरीत खुलासा या ठिकाणी होतो. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातलं हे आडगाव. हसतं खेळतं सगळ्या गावासारखंच हे गाव. पण अचानक या गावात मोठा ग्लोबल प्रोजेक्ट एंट्री करतो आणि गाव उध्वस्त होऊ लागतं. थोडा शिकल्या सावरलेल्या पंढीरीचा यासाठी विरोध असतो. आपलं गावाचं गावपण वाचवण्यासाठी पंढरीने केलेला संघर्ष या चित्रपटात दिग्दर्शकाने दाखवला आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

कथा आणि पटकथा उत्तमच. पण त्यातील प्रत्येक पात्र आपल्या आयुष्याशी निगडीत असल्याचा भास चित्रपट पाहताना वेळोवेळी होतो. तांड्यावरील खरे, गावकुसावरची हागणदारी, आजीच्या घरासमोर असलेलं सखूचं घरं, गावचा पार, विहीर हे सगळं जुळून येणारं दृष्य. कथेची सांगड आणि चित्रपटाची मांडणी योग्य पद्धतीने झाल्याचं हा चित्रपट पाहिल्यानंतर कळतं. हसत्या खेळत्या गावापासून ते उध्वस्त होईपर्यंतचा प्रवास एका लयीत पुढे सरकतो. बज्या आणि सखू या पात्राने कमाल केलीये. चित्रपटाच्या मध्यभागी असलेला या दोघांचा एक सीन चांगलाच हसवतो. मध्येमध्ये काही पात्र आणि त्यांच्या संवादाची विसंगती जाणवते पण ज्योती सुभाष यांच्या आजीच्या भुमीकेने, सखूच्या नकू नकू या संवादाने त्याची विसर पडते. प्रेमाच्या स्वप्नाचा जसा झाडाच्या वाळलेल्या पाणासारखा चुराडा होत असतो त्याप्रमाणे बजाच्याही स्वप्नाचा चुराडा होताना दिसतो.

मधल्या काळात रेंगाळलेली फिल्म संगीतकार आणि पार्श्वसंगीताने चित्रपट उचलून धरली आहे. 'एल्गार होऊ दे'या गाण्याची आणि पंढरीच्या प्रवासाची सांगड घालण्याचं कौशल्य दिग्दर्शकाने मिळवलंय. गाव वाचवण्यासाठीची पंढरीची तळमळ, संघर्ष आणि गावपुढाऱ्याचा त्याला होणारा विरोध प्रेक्षकांच्या मनात चीड आणतो. त्याचा आडगाव ते मुंबई प्रवास, त्याला मारण्याचा प्रयत्न आणि सयाजी शिंदे यांच्या रूपातला क्रूर पण दिसायला सोज्वळ असलेला महसूल मंत्री.. उत्तमच...

यासगळ्यात चित्रपटाचे कार्यकारी निर्माता प्रशांत जठार यांचे कौतूक करावे लागेल. कोरोनाच्या काळात मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला असताना अशात चित्रपटांची निर्मिती ही अवघड गोष्ट आहे. अशातच मराठी चित्रपटांकडे जास्तीत जास्त प्रेक्षकवर्ग खेचून आणणं ही आव्हानात्मक गोष्ट म्हणावी लागेल. कार्यकारी निर्माता म्हणून त्यांची धडपड ग्लोबल आडगावच्या निमित्तानं दिसून आली असून ती कौतूकास्पद म्हणावी लागेल.

Global Aadgaon Marathi Film
Turkey Earthquake : लेकरांच्या किंचाळ्या, पळापळ अन् डोळ्यांदेखत इमारती जमीनदोस्त, Video
Global Aadgaon
Global AadgaonSakal

संकलन, VFX, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद उत्तम झालेत... काही संवाद अनपेक्षित आहेत पण पात्रांनी ते लीलया पेललेत. चित्रपट कुठंही ताणल्यासारखा वाटत नाही. एका गंभीर कथेला प्रेमाचा वास बज्या आणि सखूच्या अपूर्ण प्रेम कथेने दिला आहे. शेवटच्या टप्प्यात बजाची चुकीच्या पत्त्यावर गेलेली चिठ्ठी आणि चुकीच्या मुलीने व्यक्त केलेलं खरं प्रेम डोळ्यात टचकन पाणी आणायला भाग पाडतं. आपल्या मातीला, मायेला वाचवण्यासाठी पंढरीचा एक संघर्षमय प्रवास, आणि आडगावचं झालेलं ग्लोबल आडगाव... आपलं गाव, आपली माती, संस्कृती गमवायची नसेल तर गावातून आलेल्या प्रत्येक मातीतल्या लेकराने हा चित्रपट पहायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com