Marathi Film Industry: शिंदे सरकारमुळे मराठी सिनेमाला येणार अच्छे दिन! आता चित्रपटांना मिळणार फिल्मबाजार पोर्टलचा टेकू

Marathi Film Industry
Marathi Film IndustryEsakal
Updated on

मराठी मनोरंजन विश्वात आता अनेक नवनविन बदल होत आहे. अनेक नवीन संकल्पनाच्या आधारावर चांगले चित्रपट तयार होत आहे. प्रेक्षकांना हे चित्रपट आवडत असून केवळ मराठी सृष्टीतच नव्हे तर जगभरात मराठी चित्रपटांची चर्चा होते.

मात्र मराठी चित्रपटांना आणि मराठी चित्रपटसृष्टीला राज्य सरकारकडून काही मदत किंवा प्रोत्साहन मिळत नाही अशी तक्रार बरेच कलाकर करतात. मात्र आता सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.

Marathi Film Industry
Samantha: 'त्याला प्रेमाची कदर नाही म्हणून', नागा चैतन्य अन् शोभिताच्या नात्यावर सामंथा जरा स्पष्टच म्हणाली

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार या संकल्पनेअंतर्गत लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ यांना एकत्र आणून सुलभ चित्रपटनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात.

त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांसाठी सर्व सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे सरकारी पोर्टल लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली होती.

मराठी भाषेतील चित्रपट, मालिका, ओटीटी क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने फिल्मबाजार पोर्टल विकसित करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे.

यासाठी मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी, प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते महेश कोठारे यासह चित्रपट क्षेत्रातील एकूण सहा तज्ज्ञाची शासनाने समिती गठीत केली आहे.

Marathi Film Industry
Delhi Metro Girl: दिल्लीत झपाट्याने वाढतोय 'उर्फी व्हायरस'! मेट्रोत एकीनं सादर केला विचित्र फॅशनचा नमुना

स्वप्नील जोशी यांची संकल्पना

फिल्म बाजार पोर्टलची संकल्पना अभिनेते स्वप्नील जोशी यांची आहे. त्यांच्या या संकल्पनेचे स्वागत करत त्यावर तातडीने समिती गठित करून काम सुरू करण्याचे आदेश सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com