esakal | आता अनुभवा नुसती 'स्टाईल ! मराठी मुलगी प्रेरणा घेऊन येतेय मराठी इंडस्ट्रीतले पहिलेवाहिले स्टाईल अवॉर्ड्स
sakal

बोलून बातमी शोधा

आता अनुभवा नुसती 'स्टाईल ! मराठी मुलगी प्रेरणा घेऊन येतेय मराठी इंडस्ट्रीतले पहिलेवाहिले स्टाईल अवॉर्ड्स

नवीन वर्षामध्ये अनेक नवनव्या गोष्टी आपल्यासमोर येणार आहेत. त्यातीलच एक भन्नाट गोष्ट म्हणजे 'एम टाऊन स्टाईल अवॉर्ड

आता अनुभवा नुसती 'स्टाईल ! मराठी मुलगी प्रेरणा घेऊन येतेय मराठी इंडस्ट्रीतले पहिलेवाहिले स्टाईल अवॉर्ड्स

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : २०२० आपल्या सर्वांसाठीच फारच बकवास गेलं असं म्हंटल तर वावगं ठरू नये. कुठे जाणं येणं नाही, काही मज्जा मस्ती नाही. टीव्ही लावला तर फक्त कोरोना एके कोरोनाच्या बातम्या. अनेक दिवस तर टीव्हीवर आपण फक्त कोरोनाच्या बातम्या आणि जुने मालिकांचे भाग पाहत होतो. जसा सर्व क्षेत्रांना कोरोनाचा जबर फटका बसला, तसाच तो मनोरंजन क्षेत्राला देखील बसला. मात्र येणारं वर्ष  आपल्यासाठी आणि मनोरंजन क्षेत्रासाठी नवीन पॉझिटिव्हिटी आणि नवी आशा घेऊन येणारं आहे.

नवीन वर्षामध्ये अनेक नवनव्या गोष्टी आपल्यासमोर येणार आहेत. त्यातीलच एक भन्नाट गोष्ट म्हणजे 'एम टाऊन स्टाईल अवॉर्ड'('M'TOWN STYLE AWARD). महत्त्वाची बाब म्हणजे एक मराठी मुलगी 'प्रेरणा सूर्यवंशी' हिची ही संपूर्ण कॉन्सेप्ट असून, मराठी मातीमधील फॅशन आणि स्टाईल सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी या अनोख्या 'M'TOWN STYLE AWARDS चं आयोजन करणार असल्याचं तिने इ-सकाळ ला सांगितलंय.

बरं ! आता पते कि बात, म्हणजे हे अवॉर्ड मिळणार तरी कुणाला? तर हे अवॉर्ड्स मराठी क्षेत्रात काम करणाऱ्या TV मालिकांमधील कलाकार, वेब सिरीजमध्ये काम करणारे कलाकार, नाटक क्षेत्रातील कलाकार, डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, तसेच क्रीडा आणि माध्यमांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणार आहेत. 

मराठी इंडस्ट्रीच्या स्टाईल सस्टेटमेंटमध्ये गेल्या काही काळात कमालीचा बदल झालाय. अशात या कलाकारांची किंवा व्यक्तीमत्त्वांची हवी तेवढी दखल अजूनही घेतली जात नाही. या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी, त्यांच्या फॅशन आणि स्टाईलला अधिकाधिक प्रोत्साहन, आपली फॅशन सर्वदूर पोहोचवण्यासाठी, तसेच त्यांना एक हक्काचं व्यासपीठ उभं करून देण्यासाठी हे अवॉर्ड्स सुरु करणार असल्याचंही प्रेरणा सूर्यवंशीने इ-सकाळ ला सांगितलं आहे. 

स्टाईल आणि फॅशनला समर्पित 'M'TOWN STYLE AWARD' हा मराठीतील पहिलावहिला पुरस्कार सोहळा असेल. 

marathi girl prerana suryawanshi Mtown style awards fashion and style  industry 

loading image