'चित्रपटातून शिव्या काढणार नाही'; दिग्दर्शक महेश मांजरेकर ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'चित्रपटातून शिव्या काढणार नाही'; दिग्दर्शक महेश मांजरेकर ठाम
'चित्रपटातून शिव्या काढणार नाही'; दिग्दर्शक महेश मांजरेकर ठाम

'चित्रपटातून शिव्या काढणार नाही'; दिग्दर्शक महेश मांजरेकर ठाम

मुंबई - आपल्या हटकेपणासाठी आणि परखड स्वभावासाठी प्रसिद्ध असणारे दिग्दर्शक महेश मांजरेकर चर्चेत आले आहे. येत्या शुक्रवारी त्यांनी दिग्दर्शित केलेला आणि प्रसिद्ध अभिनेता सलमान खानची भूमिका असलेला अंतिम - द फायनल ट्रुथ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये मांजरेकर यांनी आपल्या आगामी मराठी चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. तो चित्रपट पूर्ण झाला असून सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीमध्ये सापडला असल्याचे सांगितले आहे. मात्र काहीही झालं तरी बोर्डाकडून आपण हिरवा कंदील मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

अंतिम द फायनल ट्रुथच्या पत्रकार परिषदेमध्ये मांजरेकर यांनी आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे. यावेळी त्यांना त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, आपण मराठीतील प्रसिद्ध कथाकार जयंत पवार यांच्या वरणभात लोन्च्या अन् कोण नाय कोन्चा या कथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती केली आहे. मात्र हा चित्रपट सध्या सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडल्याचे मांजरेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, त्या चित्रपटामध्ये बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी शिव्या असल्याचे कारण दिले आहे. त्यामुळे तो पास करणे अवघड असल्याचे सांगितले आहे. मात्र आपण त्याबाबत ठाम असल्याचे मांजरेकर यांनी सांगितले आहे.

त्या मराठी चित्रपटावर पुन्हा एकदा परिक्षण समिती आपलं मत नोंदवणार आहे. यावर मांजरेकर यांनी आपण चित्रपटातून शिव्या काढणार नसल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही? याबद्दल मराठी प्रेक्षकांना कुतूहल आहे. दुसरीकडे पुढील दोन दिवसांनी प्रदर्शित होणाऱ्या आपल्या अंतिम द फायनल ट्रुथ नावाच्या चित्रपटाबद्दल मांजरेकर यांनी सांगितलं की, मराठी चित्रपट मुळशी पॅटर्न या चित्रपटाचा हिंदी रिमेक अंतिम हा आहे. सलमानसह आणखी मोठी मराठी कलाकारांची फौज चित्रपटामध्ये दिसून येणार आहे.

loading image
go to top