कोल्हापुरकर-सांगलीकरांनो आम्ही कलाकार तुमच्या सोबत आहोत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

कोल्हापूर आणि सांगली हे दोन्ही जिल्हे रसिकप्रेमी म्हणून ओळखले जातात. म्हणूनच मराठी कलाकारांनी महापूरात अडकलेल्या नागरिकांना घाबरु नका आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास दिला आहे. 

कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीला आलेल्या पूरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने थैमान घातले आहे. दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना सुरशिक्षत स्थळी हलविले जात आहे. कोल्हापूर आणि सांगली हे दोन्ही जिल्हे रसिकप्रेमी म्हणून ओळखले जातात. म्हणूनच मराठी कलाकारांनी महापूरात अडकलेल्या नागरिकांना घाबरु नका आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास दिला आहे. 

कोल्हापूर मराठी चित्रपटसृष्टीचे भूषण आणि चित्रनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणूनच मराठी इंडस्ट्रीमधील सुबोध बावे, प्रसाद ओक, रवी जाधव, श्रुती मराठे अशा अनेक कलाकरांनी ट्विट करत आपला पाठींबा दर्शविला आहे. 

''ज्या कोल्हापूरकर,सांगलीकर रसिकांनी इतकी वर्ष आम्हाला सांभाळलं,आमच्या वर उदंड प्रेम केलं ते संकटात असताना आम्हीही मागे राहू शकत नाही. आम्ही मराठी नाट्य,चित्रपट आणि दूरचित्रवाणी वरील सर्व कलाकार नेहमी तुमच्या सोबत आहोत,'' असे ट्विट सर्व कलाकरांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Industry Stars supports flood victims from Kolhapur and Sangli