'माझी, तुमची, आपल्या सगळ्यांची...बकेट लिस्ट' - ट्रेलर लॉन्च

शनिवार, 5 मे 2018

हिंदी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय रणबीर कपूर ही या चित्रपटात काही क्षणांसाठी झळकला आहे. ट्रेलरमुळे चित्रपटाची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे.  

'धकधक गर्ल' माधुरी दिक्षीत 'बकेट लिस्ट' या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पुन्हा कमबॅक करत आहे. नुकताच या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अनेक दिवसांनी माधुरी मराठमोळ्या लुकमध्ये दिसल्याने प्रेक्षकही सुखावून गेले आहेत. तसेच माधुरीसोबत या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार बघायला मिळतील. विशेष म्हणजे करण जोहर 'धर्मा प्रॉडक्शन'मार्फत प्रथमच मराठीत सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवत आहे. 

हृदयदान केलेल्या एका तरूणीच्या- सईच्या इच्छांची पूर्ती माधुरीचा व्यक्तिरेखा करते. तिने चाळीशितल्या गृहीणीची व्यक्तिरेखा साकारली आहे. सईच्या इच्छा पूर्ण करताना तिला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, ती या इच्छा कशी पूर्ण करते याची रंजक कहाणी या चित्रपटातून मांडली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय रणबीर कपूर ही या चित्रपटात काही क्षणांसाठी झळकला आहे. ट्रेलरमुळे चित्रपटाची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi movie bucket list trailer launch