Dhishkyaoon: लग्नाचे डोहाळे प्रथमेशला भोवले, बायकोनं थेट कानपटावर...

दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा 'ढिशक्यांव' चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ ला होणार प्रदर्शित
Dhishkyaoon
DhishkyaoonEsakal

सोशल मिडियावर कधी कसली चर्चा रंगेल सांगता येत नाही. तसचं काही दिवसांपासून मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. 'आमचं ठरलं आहे, लग्नाला यायचं हं... पत्रिका गुरुवारी पाठवतोय.' असे म्हणत बोहल्यावर चढण्यास सज्ज झालेल्या प्रथमेशच्या या सोशल मीडियावरील पोस्टच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र हे ही तितकेच खरे आहे की प्रथमेश खऱ्या आयुष्यात नव्हे तर मोठ्या पडद्यावरील आयुष्यात बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे.

Dhishkyaoon
Bigg Boss 16: "तेरा घर चला जाएगा इसमें" शेवटी डायलॉग मारलाचं! टिनावरुन पुन्हा शालिन आणि स्टॅन मध्ये राडा...

विनोद आणि प्रेम याचं उत्तम समीकरण साधत प्रथमेश परब अभिनित 'ढिशक्यांव' या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलयं. चित्रपटाचे मोशन पोस्टर पाहता पोस्टर मध्ये प्रथमेश मुंडावळ्या बांधून, नवरा बनून त्याच्या बायकोसोबत पाहायला मिळतोय मात्र या पोस्टरमध्ये गोंधळात पाडणारी बाजू म्हणजे प्रथमेशच्या बायकोच्या हातात बंदूक पाहायला मिळत असून ती बंदूक तिने प्रथमेशवर रोखून धरलेली आहे, तर प्रथमेश आणि अहेमदच्या गळयात हार पाहायला मिळतोय त्यामुळे हा नेमका गोंधळ काय आहे हे गुपित १० फेब्रुवारी २०२३ ला समोर येणार आहे.

Dhishkyaoon
Ved Teaser: ‘दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल....मनात थोडी आतुरता..थोडी भीती’ ‘वेड’ लावयला येतोय रितेश…

दिग्दर्शक प्रितम एस के पाटील दिग्दर्शित 'ढिशक्यांव'' हा चित्रपट निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एसके पाटील यांनी निर्मित केला असून चित्रपटाची प्रस्तुती एव्हीके एंटरटेनमेंट (AVK Entertainment), अमोल कागणे, प्रणित वायकर यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांनी उत्तमरीत्या पेलली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून राजीव पाटील, राहुल जाधव आणि उमाकांत बरदापुरे यांनी बाजू सांभाळली आहे.

Dhishkyaoon
Bigg Boss 16: बिग बॉसने दिला सुंबुलला जोराचा दणका..

चित्रपटाची कथा लेखक संजय नवगिरे लिखित आहे. तर चित्रपटात प्रथमेश परब सोबत संदीप पाठक, अहेमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे, प्रणव पिंपळकर, राजीव पाटील, सिद्धेश्वर झाडबुके, आसावरी नितीन, प्रसाद खैरे, साक्षी तोंडे, महेश घाग, मधु कुलकर्णी, बादशाह शेख, अमित दुधाने, शिव माने, विनया डोंगरे, हर्ष राजपूत, सोमनाथ गिरी या कलाकारांना पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. तर नवोदित अभिनेता अहेमद देशमुख 'ढिशक्यांव' चित्रपटातून स्वकर्तुत्वाने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

'ढिशक्यांव' चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर उत्सुकता लागून राहिली आहे ती चित्रपटाच्या कथेची. चित्रपटात हे सर्व कलाकार मिळून काय धुडगूस घालणार आहेत याकडे साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत. आणि त्यासाठी जास्त विलंब न करता येत्या १० फेब्रुवारी २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटसुध्दा प्रेक्षकांना खुर्चीमध्ये खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल, यात वादच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com