esakal | फॅन्ड्री'तील जब्या येतोय, नवा लूक एकदम कडक...!
sakal

बोलून बातमी शोधा

फॅन्ड्री'तील जब्या येतोय, नवा लूक एकदम कडक...!

फॅन्ड्री'तील जब्या येतोय, नवा लूक एकदम कडक...!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मराठी सिनेसृष्टीत अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत,ज्या सिनेमांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. त्यातलातच एक सुपरहिट सिनेमा म्हणजे'फॅन्ड्री'.या सिनेमामध्ये जब्याची भूमिका साकारणारा सोमनाथ अवघडेला घराघरात ओळख मिळली होती. आता तो एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. चिञपटाचे नाव आहे,फ्री हिट दणका'. हा चिञपटाचे १७ डिंसेबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. एसजीएम फिल्म्स् प्रस्तुत'फ्री हिट दणका'या चिञपटाचे नवीन पोस्टर रिलिज झाला असून हा चिञपटाचे १७ डिंसेबर २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे

सुनील मगरे दिग्दर्शित चित्रपटामध्ये फॅन्ड्री फेम सोमनाथ अवघडे आणि अपूर्व एस. यांच्यासह सैराट चिञपटातील अरबाज (सल्ल्या)आणि तानाजी (लंगड्या)यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चिञपटाची कथा सुनील मगरे यांची असून, लेखन आणि संवाद नवगीरे यांचे आहेत.आकाश ठोंबरे, मेघनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चिञपटाचे निर्माते आहेत.या चिञपटात प्रमुख भूमिकेत दिसणारी अपूर्व एस. हिने यंटम या चिञपटात काम केले आहे. अरबाज आणि तानाजी सध्या झी मराठी वरील मन झालं बाजिंद या मालिकेमध्ये दिसतं आहेत.

जब्या हे पात्र नागराज मंजुळे दिग्दर्शित फॅन्ड्री या चित्रपटातून सर्वप्रथम प्रेक्षकांसमोर आले. तेव्हापासून त्याला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळ्याचे दिसून आले. हदयस्पर्शी कथा, प्रभावी संवाद, लक्षवेधी छायाचित्रण यामुळे फॅन्ड्रीचा मोठ्या प्रमाणावर गौरव करण्यात आला. त्याला केवळ देश पातळीवर नव्हे तर आतंरराष्ट्रीय पातळीवर देखील त्याला मोठ्या प्रमाणात गौरविण्यात आले होते. या चित्रपटानंतर त्याला फारशी चमकण्याची संधी काही मिळाली नाही. आता ती फ्री हीट दणकामधून मिळणार आहे. यामुळे सोमनाथनं आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा: वीणा आणि शिवचं ब्रेक-अप? सोशल मीडियावर चर्चा...

हेही वाचा: NCB चे कॉर्डेलिया क्रूझवर पुन्हा सर्च ऑपरेशन; आणखी 8 जण ताब्यात

loading image
go to top