काय बघताय काय? गर्लफ्रेंड आहे माझी!

Tuesday, 28 May 2019

गेले अनेक दिवस नच्या 'गर्लफ्रेंड' शोधत होता. सोशल मीडियावर सगळेजण त्याला गर्लफ्रेंड मिळाली का विचारत होते. अखेर काही दिवसांपूर्वी त्याने पोस्टक शेअर करत अलिशा त्याची गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले आणि त्याला गर्लफ्रेंड मिळाल्यामुळे सगळ्यांनी आनंद व्यक्त केला.  

गेले अनेक दिवस नच्या 'गर्लफ्रेंड' शोधत होता. सोशल मीडियावर सगळेजण त्याला गर्लफ्रेंड मिळाली का विचारत होते. अखेर काही दिवसांपूर्वी त्याने पोस्टर शेअर करत अलिशा त्याची गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले आणि त्याला गर्लफ्रेंड मिळाल्यामुळे सगळ्यांनी आनंद व्यक्त केला.  

अमेय वाघ म्हणजेच नचिकेतला अलिशा म्हणजेच सई ताम्हणकर मिळाली. आजच त्याने आपल्या गर्लफ्रेंडची झलक ट्विटरवरून सगळ्यांना दाखवली... 'अख्ख्या जगावेगळी अशी ही गर्लफ्रेंड'! असे वर्णन नचिकेतने अलिशाबद्दल केलंय. आज शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अलिशा बिनधास्त, स्वच्छंद आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे.

'गर्लफ्रेंड' चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन उपेन्द्र सिधये यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ह्यूज प्रॉडक्शन आणि प्रतिसाद प्रॉडक्शनने केली आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही जगातील एका मुलाची कथा या चित्रपटात मांडली आहे. या चित्रपटासाठी अमेयने खास तयारी केली असून त्याने नचिकेतच्या व्यक्तिरेखाठी तब्बल 8 किलो वजन वाढवले होते, तसेच त्याचा वेगळा लूक या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर सई ताम्हणकर हिचाही एक हटके अंदाज या चित्रपटात दिसेल. 26 जुलैला 'गर्लफ्रेंड' प्रदर्शित होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi movie Girlfriend teaser launch