'छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाला मुंबईत प्राईम टाईम का नाही?'

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यावरील चित्रपट सध्या चर्चेत आले आहेत.
Akshay Waghmare News
Akshay Waghmare Newsesakal

Marathi Movie: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यावरील वेगवेगळे चित्रपट सध्या चर्चेत आले आहेत. या चित्रपटांची (Entertainment News) निर्मिती करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होतो. शिवअष्टक या चित्रमालिकेतील चौथं पुष्प शेर शिवराज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र त्याला राज्याची राज्यधानी असलेल्या मुंबईतील थिएटरमध्ये प्राईम टाईम मिळत नसल्याची खंत अनेक सेलिब्रेटींनी व्यक्त केली (Marathi Movie News) आहे. त्यामध्ये पावनखिंड' तसेच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिऍलिटी शो 'बिग बॉस मराठी'मध्ये झळकलेला अभिनेता अक्षय वाघमारेनं सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट शेयर केली आहे. त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. (Social media viral News) महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील चित्रपटाला प्राईम टाईम का मिळत नाही असा सवाल त्यानं यावेळी उपस्थित केला आहे.

अक्षयनं आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा ऐतिहासिक चित्रपट शेर शिवराज हा गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला . फर्जंद , फत्तेशिकस्त , पावनखिंड आणि आता शेर शिवराज असे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यामागे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा एकच उद्देश होता की महाराजांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचायला हवा , नवीन पिढीला स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा. स्वराज्याची स्थापना ते परकीयांचे आक्रमण या आणि अनेक बाबी या चित्रपटांद्वारे मांडल्या गेल्या आहेत आणि मराठी जनतेने उत्स्फुर्त पणे या सर्व चित्रपटांना प्रतिसाद दिला आता सुद्धा महाराष्ट्रातील जनता शेर शिवराज हा चित्रपट पाहू इच्छिते पण तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिला जात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शो चे वेळापत्रक अर्थात शो टाइम्स.

Akshay Waghmare Post
Akshay Waghmare Post

यापूर्वी देखील मराठी चित्रपटांना प्राईम टाईम दिला जात नाही यावरुन वाद झालेला दिसून आला होता. मात्र त्याची गांभीर्यानं दखल घेण्यात आली नाही. आता पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आल्यानं मराठी चित्रपट प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे. अक्षयनं त्याबदद्ल परखड प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सगळे प्राईम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात आणि त्या वेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेली आहे चित्रपटाच्या निर्मितीमागे असंख्य हात लागलेले असतात या चित्रपटसृष्टीत अनेक लोकांचे उत्पन्न अवलंबून आहेत या सगळ्याचा विचार कोण करणार ?? आपल्याच राज्यात राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी होत असेल तर या संदर्भात आवाज उठवायला नको का ?? जी व्यवस्था हे सगळं बघत आहेत त्यांनी या विषयी काहीतरी धोरण अवलंबनार आहेत की नाही ? नाही तर इथून पुढे मराठी चित्रपट निर्मिती करतांना निर्माते देखील १० वेळा विचार करतील आणि अनेक लोक बेरोजगार होतील.

मराठी माणसाने म्हणजे सन्मानीय दादा साहेब फाळके यांनी हि चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि याच राज्यात मराठी चित्रपटांचे असे हाल होत आहेत. जर निर्मात्यांचे अशा प्रकारे नुकसान होणार असेल तर आम्ही कलाकारांनी देखील का काम करावे हा पण एक प्रश्न आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रात आहे तर इतर चित्रपटांबद्दल बद्दल काय बोलणार ? बस झाला यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही ... मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे. प्राइम टाइम आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ...या शब्दांत अक्षयनं आपला राग व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com