esakal | हेडफोन लावा अन् अजयच्या आवाजातलं 'मळवट' ऐकाच!
sakal

बोलून बातमी शोधा

हेडफोन लावा अन् अजयच्या आवाजातलं 'मळवट' ऐकाच!

हेडफोन लावा अन् अजयच्या आवाजातलं 'मळवट' ऐकाच!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - केवळ मराठीतच नाहीतर बॉलीवूडमध्ये सुद्धा ज्यांच्या स्वरसाजाची दादागिरी आहे अशा अतुल अजयपैकी अजय यांच्या आवाजातलं नवं गाणं प्रसिद्ध झालंय. त्या गाण्याला आतापर्यत मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. यापूर्वी अजय अतुलच्या गाण्याला मिळालेला प्रतिसाद आपण पाहिला आहे. त्याच्या फँन्ड्री, सैराटमधील गाण्यांना चाहत्यांनी डोक्यावर घेतले. त्या गाण्यांना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सध्या अजयच्या सोयरीकमधील मळवटची चर्चा आहे. त्या गाण्यामध्ये त्यानं देवीची आराधना केली आहे. ज्या रीतीनं अजयनं हे गाणं सजवलं आहे त्याला तोड नाही. हेडफोन लावुन हे गाणं ऐकल्यास त्याचा येणारा फील तर कमाल आहे. या गाण्याला संगीतकार विजय गावंडे यांनी दिलेलं संगीत प्रभावी आहे. त्या गाण्यातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नवरात्रीच्या दिवसांत अजय अतुलच्या गाण्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या गाण्याला आतापर्यत मोठ्या प्रमाणात व्ह्युज मिळाले आहेत. अजय अतुलला चाहत्यांनी नेहमीप्रमाणे कौतूकाची थाप दिली आहे. त्याचे भरभरून कौतूक केले आहे. अभिनंदनही केले आहे. त्या गाण्यामध्ये वाजवण्यात आलेले संबळ, त्याचा तो नाद श्रोत्यांना वेगळाच आनंद देणारा ठरला आहे. त्या गाण्याच्या माध्यमातून अजय अतुलनं यल्लमा देवीचा जागर केला आहे. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ ची निर्मिती असलेल्या आगामी ‘सोयरीक’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी हा गोंधळ गायला आहे.

डोई धरीला धरीला आईचा देव्हारा, भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा..... पाला लिंबाचा बांधिला, तुझा मळवट भरीला, तुझी भरून गं वटी, तुला निवद दाविला.... आई गोंधळ मांडिला ये गं तू जागरा, येल्लू आईचा उधं उधं.....याला श्रोत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आणि ही जादू आहे अजय अतुलच्या स्वरांची. गीतकार वैभव देशमुख यांनी हा गोंधळ लिहिला आहे. तर त्याला संगीत दिलं आहे संगीतकार विजय गावंडे यांनी. त्यांच्या संगीतानं वेगळा स्वरानंद यानिमित्तानं मिळाला आहे. या गाण्याविषयी अजय गोगावले यांनी सांगितलं होतं की, सुरुवातीला जोगवा मध्ये गाण्याची संधी मिळाली होती. आता ती मळवटच्या निमित्तानं मिळाली आहे. सोयरीक या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मकरंद साने यांनी केलं आहे.

loading image
go to top