
Bigg Boss Marathi 4: ''तर तुझा दुसरा हातही तुटेल ...'', घरात एन्ट्री करताच तेजस्विनीवर का भडकली राखी?
Bigg Boss Marathi 4: आज बिग बॉस मराठीच्या घरात होणार Entertainment Queen म्हणजेच राखी सावंतची एन्ट्री. घरात जाताच तेजस्विनी आणि राखी मध्ये वादाची ठिणगी पडणार आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. घरातील रहिवासी संघ बोर्डवर १ नंबरवर कोणाच्या नावाची पाटी लागणार ? यावरून दोघींमध्ये वाद रंगताना दिसणार आहे.(Bigg Boss Marathi 4: Rakhi Sawant And Tejaswini Lonari Argument...video)
हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: 'मी तिलाच घाबरतो या घरात...', घरात इतक्या महिला...विकास कोणाविषयी बोलला?
वाद सुरु होतो घरात रहिवासी संघ बोर्डावर कोणाच्या नावाची पाटी पहिली लागणार यावरनं. खरंतर तिथं आधीपासून तेजस्विनीच्या नावाची पाटी पहिल्या क्रमांकावर असते पण ड्रामा क्वीन राखी घरात एन्ट्री केल्या केल्या तेजस्विनीच्या नावाची पाटी पहिल्या क्रमांकावरनं हटवते आणि स्वतःच्या नावाची पाटी तिथे लावते.आणि मग सुरू होता खरा ड्रामा..
राखीनं तेजस्विनीची पाटी हटवताच तेजस्विनी म्हणते,''राखी मॅडम माझ्या पाटीची जागा आहे ती...'', तेवढ्यात राखी म्हणते,''बरोबर आहे तुझं,पण आता ... '' , आता तेजस्विनीही काही मागे हटायला तयार नसल्यानं लगेच म्हणताना दिसते,'' मी माझ्या एक नंबरवरच माझी पाटी लावणार'', पण राखी म्हणते, ''मी आता लावलेली आहे माझ्या नावाची पाटी तिथे'. तेजस्विनी म्हणाली, ''असं थोडी आहे माझी पाटी आधी होती तिथे...'', राखी म्हणाली, ''मग मी तुझी पाटी तोडणार...'', तेवढ्यात तेजस्विनी म्हणाली,'' मग मी पण तुमची पाटी तोडणार ... ,यावर राखीचं टाळकं जवळ-जवळ फिरत की काय अन् तडक म्हणून बसते,''तू तोड... आता तुझा एक हात तुटला आहे... मग दुसरा तुटेल...''
बघूया हा वाद किती वाढला? कोणाची पाटी पहिल्या क्रमांकावर लागणार ? आजच्या भागात रात्री १० वा आपल्या कलर्स मराठीवर. आणि आजचा भाग चुकला तर हा मोस्ट एंटरटेनिंग भाग voot अॅपवर नक्की पहा.